Rice Farming : कृषी वैज्ञानीकांचा मोलाचा सल्ला आला…! भातशेतीत हे काम करा, उत्पादनात वाढ होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rice Farming : भारतातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामात (Kharif Season) धान या पिकाची (Rice Crop) शेती (Farming) करत असतात. भारतातील पंजाब आणि हरियाणामध्ये या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव धान पिकाची शेती करत असतात. भारतातील अनेक राज्यात सध्या भातपिकात वाढ न होण्याच्या तक्रारी शेतकरी बांधव करत आहेत. भात पिकात आलेल्या एका विषाणूमुळे धान पिकाची वाढ होत नाही.

या विषाणूजन्य रोगामुळे धान पिकाची वाढ खुंटली असल्याने पिकाच्या उत्पादनात (Farmer Income) भली मोठी घट घडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रोगामुळे भाताच्या झाडांचा आकार लहान राहतो, त्यामुळे पिकाची वाढ होत नाही आणि उत्पादनातही लक्षणीय घट होते.

या प्रकरणात, IARI-Pusa Institute (ICAR-IARI, Pusa) च्या तज्ञांची एक टीम हरियाणा आणि पंजाब राज्यात विषाणूग्रस्त भागातील वनस्पतींचे नमुने गोळा करत आहे. या प्रकरणाची दखल घेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे.

ड्वार्फिज्म विषाणूची लागण झालेल्या वनस्पतींच्या नमुन्यांनुसार, पीआर-126, पीआर-121, पीआर-114, पुसा बासमती 1509, पुसा बासमती 1692, पुसा बासमती 1401 इत्यादी वाणांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक बघायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे याविषयी आज आपण कृषी वैज्ञानिकांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

तज्ञ काय म्हणतात

भात पिकामध्ये पसरलेल्या या रोगाबाबत कृषी तज्ज्ञांचे मत आहे की, ज्या भातपिकांमध्ये हा बुरशीजन्य रोग दिसून आला आहे त्यामध्ये 5 ते 15 टक्के वनस्पतींचा विकास होत नाही.

तसे, ही समस्या काही निवडक भागातच दिसून आली आहे. या भागात, भात रोपांची लांबी सुमारे 1 फूटांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत संबंधित भात उत्पादक शेतकरी बांधवांनी प्रादुर्भावग्रस्त भाताची रोपे उपटून वेगळी केली पाहिजेत, जेणेकरून उर्वरित पिकांवर वाईट परिणाम होणार नाही.

इतकेच नाही तर हा रोग असलेल्या वनस्पतींच्या मुळांमध्येही काळेपणा दिसून आला आहे, यावरून अंदाज लावता येतो की, पौष्टिकतेच्या अभावामुळे आणि अशक्तपणामुळे या आजारचे विषाणू वाढत आहेत.

तज्ज्ञांनी असेही सांगितले की ही समस्या पंजाब आणि हरियाणातील काही पिकांमध्येच आली आहे. उत्तर प्रदेश सोबतच देशातील इतर भागात घेतले जाणारे धान पीक पूर्णपणे निरोगी आहे.

अशा प्रकारे प्रतिबंधित उपाययोजना करा 

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी भात पिकात वाढत्या ड्वार्फिज्म रोगामुळे उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत या रोगाची कारणे शोधण्यासाठी कृषी तज्ज्ञ संशोधनही करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत ठोस उपाय समोर आलेला नाही. तज्ञ सांगतात की, हे व्हायरस आणि बॅक्टेरिया दोन्ही असू शकतात.

या रोगाची लक्षणे कमी करण्यासाठी ब्राऊन प्लांट हॉपर, व्हाईट बॅक प्लांट हॉपर, ग्रीन प्लांट हॉपर यां किटकांचे नियंत्रण करण्याचा सल्ला दिला जात आहे, कारण बहुतेक हा रोग किडींमुळे पसरत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या किडींच्या प्रतिबंधासाठी 94 मिली पॅक्सलॉन 250 लिटर पाण्यात विरघळवून प्रति एकर शेतात फवारणी करावी.

शेतकर्‍यांना हवे असल्यास ते 250 लिटर पाण्यात ओशन आणि टोकन नावाचे 100 ग्रॅम औषध विरघळवून प्रति एकर शेतात वापरू शकतात.

भात पिकातील कीड नियंत्रणासाठी 120 ग्रॅम चास औषध 250 लिटर पाण्यात विरघळवून प्रति एकर वापरणे फायदेशीर ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, धानाच्या लवकर किंवा आगात रोवणी केलेल्या भातपिकांमध्ये ड्वार्फिजम विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियंत्रणाची कामे करा.

याशिवाय शेतकर्‍यांना रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करावा लागेल, कारण त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि पिकामध्ये विकृती निर्माण होते.

भात पिकातील ड्वार्फिज्म विषाणू किंवा भात पिकातील हा रोग टाळण्यासाठी धानाची सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा.