Soybean Crop Management : सावधान! सोयाबीन पिकासाठी ‘हा’ रोग ठरतोय घातक, ‘या’ पद्धतीने नियंत्रण करता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या चरणातील मान्सूनने (Monsoon) मोठ्या प्रमाणात थैमान माजवल आहे. राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे तसेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन या पिकावर रोगांचे (Soybean Crop Disease) सावट बघायला मिळत आहे. सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकावर पिवळा मोजेक रोग (Yellow Mosaic Disease) आला आहे.

मित्रांनो फक्त आपल्या राज्यातच नव्हे तर देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात देखील पिवळा मोजेक हा रोग प्रामुख्याने बघायला मिळत आहे. या रोगामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे.

जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना या रोगावर वेळीच नियंत्रण (Soybean Pest Control) मिळविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला देत आहेत. आज आपण देखील सोयाबीन पिकासाठी घातक ठरणार्‍या या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण (Soybean Crop) मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या पिवळा मोजेक रोग त्याची लक्षणे आणि नियंत्रण पद्धती जाणून घेऊया.

पिवळा मोझॅक रोग म्हणजे काय?

जाणकार लोकांच्या मते, हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. कृषी तज्ञांच्या मते पांढरी माशी झाडाच्या देठावर अंडी घालते. यामुळे, सोयाबीनच्या देठात सुरवंट तयार होतात. हे सुरवंट स्टेममधील जाइलम नष्ट करतात. यामुळे झाडे पिवळी पडतात आणि हळूहळू झाडांची वाढ खुंटते. निश्चितच या रोगाच्या नियंत्रणासाठी पांढरी माशी या किटकांवर नियंत्रण करावे लागणार आहे.

पिवळ्या मोज़ेक रोगाची लक्षणे

सुरुवातीला हा रोग काही झाडांवरच दिसून येतो, पण हळूहळू तो भयंकर रूप धारण करतो. जेव्हा सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा काही झाडांवर गडद हिरवट पिवळे ठिपके दिसतात. संपूर्ण झाडे वरून पिवळी पडतात आणि नंतर संपूर्ण शेतात पसरतात. यानंतर या रोगामुळे झाडे मऊ होतात, तसेच झाडे मुरगळतात. कधी कधी पानेही खडबडीत होतात.

पिवळा मोज़ेक रोग उपाय

जाणकार लोकांच्या मते या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी म्हणजे पांढरी माशीचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी सोयाबीनच्या शेतात ठीक-ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावतात. यामुळे पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी करता येतो परिणामी हा रोग पसरत नाही.

या रोगाने संक्रमित झालेली झाडे उपटून टाका आणि दूरवर खड्डा खणून गाडून टाका.

कृषी तज्ञांच्या सल्ल्याने किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांच्या सल्ल्याने शेतकरी बांधव शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करू शकतात.

याशिवाय शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या नव्याने विकसित झालेल्या वाणांचीचं पेरणी करावी, यामुळे हा रोग सोयाबीन पिकावर येतच नाही.

या रोगाचा सोयाबीन पिकावर अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास शेतकरी बांधव रासायनिक पद्धतीने देखील या रोगाचे नियंत्रण करू शकतो यासाठी इमिडाक्लोप्रिड, थायमेथॉक्सम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन या औषधाची 125 मिली/हेक्टर या प्रमाणात फवारणी करता येते. शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्यानेच कोणत्याही औषधाची फवारणी करावी.