Soybean Farming: ऑगस्ट महिन्यात सोयाबीन पिकावर ‘या’ किटकांचा प्रादुर्भाव वाढतो ! ‘या’ पद्धतीने मिळवा नियंत्रण, फायदा होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming: सध्या देशात सर्वत्र खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर असून शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे आपल्या राज्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते.

खरं पाहता सोयाबीन एक नगदी आणि हमीचे पीक आहे. मात्र हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे सावट (Soybean Pest Control) बघायला मिळत आहे. सध्या सोयाबीन पीक दोन महिन्याचे झाले आहे, काही ठिकाणी उशिरा पाऊस पडला असल्याने सोयाबीनची उशिरा पेरणी झाली आहे. मात्र राज्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे पीक दोन महिन्याचे झाले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाचे योग्य व्यवस्थापन (Soybean Crop Management) करणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

मित्रांनो अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर किटकांचे आणि रोगांचे सावट आहे यामुळे शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने यावर वेळीच नियंत्रण मिळवावे. आज आपण सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या हैलीकोबर्पा आर्मीगेरा या कीटकाच्या नियंत्रणाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या घातक कीटकाच्या नियंत्रणा विषयी सविस्तर.

या कीटकमुळे नुकसान तरी नेमकं काय होत बर 

मित्रांनो सध्या सोयाबीन पीक दोन महिन्याचे झाले असल्याने जवळपास सोयाबीन पिकाचे अर्धे आयुष्य पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे कारण की आता सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येणार आहे. फुलोरा अवस्थेत सोयाबीन पिकाची काळजी घेतल्यास फळधारणा चांगली होते.

यामुळे फुलोरा अवस्थेत आढळणाऱ्या कीटकांवर देखील वेळीच नियंत्रण मिळवावे लागणार आहे. हैलीकोबर्पा आर्मीगेरा हे कीटक ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक आढळतात. फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकांचे यामुळे नुकसान होते. या कीटकाच्या अळ्या पानांवर खातात आणि साधारणपणे ऑगस्ट महिन्यात आढळतात. हे कीटक पाने खात असल्याने झाडाला पाने राहत नाहीत. यामुळे सोयाबीनच्या फुलांना आणि शेंगा दोघांनाही नुकसान होते.

कीटक व्यवस्थापन-

या कीटकाच्या जैविक नियंत्रणासाठी हेक्टरी 5 सापळे 50 मीटर अंतराने बसवा. त्यामुळे कीटक नियंत्रणात ठेवता येतात.

याव्यतिरिक्त शेतकरी बांधव रासायनिक नियंत्रण म्हणून कुनोल्फास 25 EC @ 1 लिटर प्रति हेक्‍टरी फवारणी करावी. 

तसेच लॅम्बडासायक्लोहॅलोथ्रीन 9CS 300 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी.

शेतकरी मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.