Soybean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात वाढ; उत्पादकांच्या भुवया उंचावल्या; उन्हाळी सोयाबीन करेल का मालामाल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Price : महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीप हंगामातील (Kharip Season) मुख्य पीक अर्थात सोयाबीन (Soybean Crop) या हंगामात कायमचा चर्चेचा विषय ठरला आहे. सोयाबीनच्या हंगामाच्या सुरुवातीला मुहूर्ताच्या सोयाबीनला विक्रमी दर (Soybean Price) मिळत होता.

राज्यातील अनेक ठिकाणी मुहूर्ताचा सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला गेला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभावात (Soybean Market Price) मोठी घसरण बघायला मिळाली.

याशिवाय, मध्यंतरी केंद्र शासनाने (Central Government) सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Grower Farmer) बाजारपेठेचा अंदाज लक्षात घेता सोयाबीनची विक्री कमी भावात करायची नाही असे ठरवले आणि सोयाबीन साठवणूककडे (Soybean Storage) आपला मोर्चा वळवला.

सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा हा धाडसी निर्णय कामी आला आणि मध्यंतरी सोयाबीनला अपेक्षित जरी नसला तरीदेखील समाधानकारक बाजार भाव मिळाला. आता खरीप हंगामातील सोयाबीन काही बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांकडे शिल्लक आहेत.

सध्या सोयाबीनच्या बाजारभावात होत असलेली पडझड थांबली असून सोयाबीन 7000 रुपये प्रति क्विंटल वर स्थिरावला आहे. गेल्या आठवड्यापासून 6800 च्या आसपास असलेले सोयाबीनच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात (Summer Season) सोयाबीनची पेरणी (Summer Soybean) केली आहे अशा शेतकऱ्यांच्या भुवया आता उंचावल्या आहेत.

गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात मोठी पडझड बघायला मिळाली. याचे कारण असे की शासनाने आधीच्या सोयापेंड आयातीपैकी उरलेल्या 5.50 लाख मेट्रिक टन सोयापेंड आयातीला सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आणि यामुळे सोयाबीनचे दर 6 हजार 800 रुपये प्रती क्विंटल वर येऊन ठेपले.

यामुळे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक करून ठेवली होती ते संकटात सापडलेत. शिवाय यामुळे उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग साफ दिसत होते.

मात्र आता सोयाबीन उत्पादक शेतकरी थोडा आनंदी बघायला मिळत आहे कारण की, गत दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात पुन्हा थोडी तेजी आली आहे. त्यामुळे साठवणूक करणारे शेतकरी व व्यापाऱ्यांसह उन्हाळी सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या भुवया आता उंचावल्या गेल्या आहेत.

गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होत असल्याने सोयाबीनची आवक देखील बाजारपेठेत मोठी कमी झाली आहे. वाशिम एपीएमसीमध्ये महिन्याभरापूर्वी जवळपास 20 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होतं होती मात्र दरात पडझड झाल्यामुळे सोयाबीनची आवक केवळ दहा हजार क्विंटल एवढी झाली असून आता यामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने वाढ होणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.

मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवडीचा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातही उन्हाळी हंगामात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.

वाशीम जिल्ह्यात सुमारे 2500 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले गेले आहे. या मध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पेरणी केलल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आता पूर्णपणे विकसित होण्याच्या मार्गावर असून आगामी काही दिवसात बाजारपेठेत दाखल होणार आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठी वाढणार आहे.