Strawberry Farming: स्ट्रॉबेरी शेतीतुन लाखोंची कमाई करायची ना..!! मग ‘या’ टेक्निकने 5 एकरात स्ट्रॉबेरी लागवड करा, 60 लाखांची कमाई होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Strawberry Farming: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेती (Agriculture) पासून दुरावत असल्याचे चित्र आहे. आता राज्यातील अनेक शेतकरी शेतीऐवजी नोकरी किंवा उद्योग धंद्यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. मात्र, जर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळणार आहे.

अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रातील जाणकार लोक तसेच कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे आता देशातील शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल देखील करीत आहेत आणि यामुळे आता हळूहळू का होईना त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे. सध्या देशातील शेतकरी बांधव फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे चित्र आहे.

राज्यात देखील असेच काहीसे दृश्य बघायला मिळत आहे. स्ट्रॉबेरी (Strawberry Crop) हे देखील एक प्रमुख फळबाग पीक आहे. स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Cultivation) आता आपल्या राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. स्ट्रॉबेरी शेतीतून शेतकरी बांधवांना आता चांगले बक्कळ उत्पन्नदेखील मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी स्ट्रॉबेरी शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत.

या राज्यात केली जाते स्ट्रॉबेरी शेती:- आपल्या देशात स्ट्रॉबेरीची लागवड रब्बी हंगामात थंड हवामान असलेल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते. याची शेती थंड हवामान असलेल्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे बघायला मिळते. मात्र आता आधुनिक तंत्राच्या मदतीने हिवाळ्याच्या हंगामात कमी थंड असलेल्या मैदानी भागातही त्याची लागवड केली जाऊ लागली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील शेतकरी हिवाळ्यात स्ट्रॉबेरीची आता लागवड करत आहेत आणि चांगली कमाई देखील त्यांना होत आहे.

स्ट्रॉबेरीच्या प्रगत जाती नेमक्या कोणत्या बरं :- स्ट्रॉबेरीच्या 600 पेक्षा जास्त जाती जगभरात उगवल्या जातात आणि खाल्ल्या जातात, परंतु भारतात कामरोसा, चँडलर, ऑफरा, ब्लॅक पीकॉक, स्वीट चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जाती व्यावसायिक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याचे सांगितले जाते. भारतातील हवामानानुसार या जातींची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत केली जाते. वालुकामय चिकणमाती आणि तांबड्या जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड करून शेतकरी बांधव उच्च उत्पादन मिळवत असल्याचा दावा केला जातो.

अशा प्रकारे स्ट्रॉबेरी लागवड करा बरं:- जाणकार लोकांच्या मते, स्ट्रॉबेरीची लागवड ही इतर फळबाग वर्गीय पिकांच्या तुलनेत खूप सोपी आहे. यासाठी कोणत्याही सामान्य फळ किंवा भाजीपाला लागवडीप्रमाणे स्ट्रॉबेरीच्या बिया पेरण्यापूर्वी सेंद्रिय पद्धतीने शेत तयार करावे लागते.

शेतात खोल नांगरणी करून, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध स्ट्रॉबेरी शेतीसाठी गांडूळ खत मिसळा, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढू लागते.

यानंतर, शेतात उंचावर बेड तयार करा आणि त्यांच्यामध्ये 1 ते 2 फूट अंतर ठेवा, जेणेकरून पिकाच व्यवस्थापन करणे सोपे होईल.

स्ट्रॉबेरी शेतीसाठी ठिबक सिंचन प्रणालीची व्यवस्था करावी आणि शेतातील ओलाव्याची विशेष काळजी घ्या.

यानंतर चांगल्या प्रतीची स्ट्रॉबेरी फार्मिंग करण्यासाठी वाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पसरवा आणि बिया पेरणीसाठी 30 सें.मी. प्लॅस्टिक आच्छादनाला ठराविक अंतरावर छिद्रे पाडावीत.

स्ट्रॉबेरी शेतीचं व्यवस्थापन कसं असावं आणि उत्पन्न किती मिळणार :- स्ट्रॉबेरी पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतात सेंद्रिय खताचा चांगला वापर करावा जेणेकरून झाडे लवकर वाढू शकतील.

शेतात स्ट्रॉबेरी लावल्यानंतर दीड महिन्यात फळे येण्यास सुरुवात होते, त्यामुळे पुढील चार महिने बंपर फळे येऊ शकतात.

अशाप्रकारे एक एकर शेतात 22 हजार स्ट्रॉबेरीची रोपे लावली तर, त्यातून दररोज 5 ते 6 किलो फळे मिळतील.

एक एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केल्यास प्रत्येक झाडापासून 500 ते 700 ग्रॅम उत्पादन घेता येते.

यातून एका हंगामात 80 ते 100 क्विंटल फळांचे उत्पादन होऊन 6 लाख ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी पाच एकरात स्ट्रॉबेरीची शेती केली तर शेतकरी बांधवांना जवळपास 35 ते 60लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.