Successful Farmer: गोरखनाथा तुम्ही नांदचं केला थेट…! शेवगा लागवड केली, कमी खर्चात 4 लाखांची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पद्धतीत केलेला बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील ठरत आहे. काळाच्या ओघात जर पीकपद्धतीत बदल केला तर काळाच्या ओघात लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) शेतकऱ्यांना मिळू शकते.

औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) गंगापूर तालुक्याच्या मौजे माळीवाडगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत शेवगा शेतीतून (Drumstick Farming) लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. मौजे माळीवाडगाव येथील प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये (farming) केलेला हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरला असून जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या शेतकऱ्याच्या बांधावर भेट देऊन त्यांचे मोठे कौतुक केले आहे.

मौजे माळीवाडगाव येथील प्रयोगशील शेतकरी गोरखनाथ गोरे यांनी ही किमया साधली आहे. गोरखनाथ रावांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात शेतीमध्ये बदल करण्याच्या हेतूने शेवग्याची लागवड केली. सध्या या तीन एकर क्षेत्रातील 25 गुंठ्याची हार्वेस्टिंग (Drumstick Harvesting) जोरावर सुरू आहे. 22 मे रोजी गोरखनाथ रावांचा शेवगा पिकाची हार्वेस्टिंग सुरू झाली.

सुरवातीला 72 किलो शेंगा 40 रुपये प्रति किलो दराने विक्री झाल्या. नंतर मात्र शेवगाला चांगला विक्रमी भाव मिळत असून सध्या गोरखनाथरावांच्या शेवग्याच्या शेंगा 60 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत. विशेष म्हणजे गोरखनाथ दादांनी उत्पादित केलेल्या शेवग्याच्या शेंगा बांधावर विक्री होत असल्याने त्यांना दुहेरी फायदा मिळत आहे.

खरं पाहता शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याचा आहे. यामुळे शेवग्याच्या शेंगाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहेत. गोरखनाथ दादांना देखील शेवगा शेतीचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे शेवग्याच्या पिकासाठी खर्च अतिशय अत्यल्प असल्याने यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत आहे.

गोरखनाथ दादांनी उत्पादित केलेला शेवगा चांगल्या क्वालिटीचा असल्याने त्यांच्या मालाला व्यापारी विशेष पसंती दाखवत आहेत. आतापर्यंत गोरखनाथ दादांना दोन लाख 86 हजार रुपयांची कमाई झाली आहे. अजून त्यांना सव्वा लाख रुपयांची कमाई होण्याची आशा आहे. म्हणजेचं गोरखनाथ दादांनी उत्पादित केलेला शेवगा चार लाख रुपये देऊन जाणार आहे.

यामुळे गोरखनाथांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या प्रयोगाचे इतर शेतकरी अनुकरण करतील अशी आशा व्यक्त होत आहे. निश्चितच गोरखनाथ दादांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून इतर शेतकऱ्यांना यामुळे मोठी प्रेरणा मिळणार आहे.