महिला शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग…! ड्रॅगन फ्रुटच्या 800 रोपांची लागवड केली, पहिल्याच तोड्यात 7 लाखांची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: कोणत्याही क्षेत्रात काळाच्या ओघात बदल करणे अतिशय आवश्यक असते. मग ते क्षेत्र शेतीचे (Farming) का असेना. शेतीमध्ये (Agriculture) देखील काळाच्या ओघात बदल केला आणि पारंपारिक पीक (Traditional Crops) पद्धतीला तसेच शेती पद्धतीला बगल देत नवीन आधुनिक पद्धतीने नगदी (Cash Crops) तसेच फळबाग पिकांची शेती केली तर निश्‍चितच शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) सहजतेने केली जाऊ शकते.

बीड जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत एकाच शेतजमिनीत चार फळबाग पिकांची शेती केली आहे. या महिलेने केलेली ही मिश्र फळशेती सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे परिसरातील इतरही प्रयोगशील शेतकरी बांधव (Farmer) या महिला शेतकऱ्यांच्या (Women Farmer) बांधावर हजेरी लावत असून या प्रयोगाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.

खरं पाहता, बीड जिल्हा दुष्काळासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो मात्र आता जिल्ह्यातील शेतकरी बांधव दुष्काळी भाग असूनदेखील नवनवीन प्रयोग शेतीत राबत आहेत आणि यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळत आहे. बीड जिल्ह्यातील विजया गंगाधर घुले या महिलेने चार प्रकारच्या फळांची मिश्र शेती करून दाखवली आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून या महिलेने तब्बल पाच ते सात लाख रुपयांची कमाई देखील करून दाखवली आहे.

आष्टी तालुक्यातील मौजे केळसांगवी येथील विजया गंगाधर घुले या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने काळाच्या ओघात बदल करत विदेशी समजल्या जाणाऱ्या ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून (Dragon fruit farming) ही किमया साधली आहे. मित्रांनो विजया यांचे दोन मुले नोकरीनिमित्ताने बाहेर असतात त्यामुळे तिची सर्व जबाबदारी विजया यांच्या खांद्यावर आहे. विजया यांनी एकट्यावर शेतीची जबाबदारी असताना देखील शेतीतून चांगली कमाई केली आहे.

त्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत ड्रॅगन फ्रुट, खजूर, सफरचंद आणि पेरू अशा चार पिकांची लागवड केली आहे. विजया यांनी केलेला हा प्रयोग आता सक्सेसफुल झाला असून यातून त्यांना वर्षाकाठी सात लाखांपर्यंतची कमाई होत आहे. यामुळे विजया यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

या महिलेने 2016 मध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. ड्रॅगन फ्रुट ची लागवड 12 फूट बाय आठ फूट या अंतरावर करण्यात आली. दोन ओळींमधील अंतर बारा फूट असल्याने मध्ये सफरचंद पेरू आणि खजूर या फळबाग पिकांची विजया यांनी लागवड केली. चार प्रकारच्या फळबाग पिकांची शेती केली असल्याने अधिक उत्पन्न मिळत असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्याने नमूद केले आहे.

विजयाताई यांनी दोन एकरात 800 ड्रॅगन फ्रुट ची रोपे लावली असून यातून पाच टन उत्पादन त्यांना मिळत आहे. म्हणजेच त्यांना ड्रॅगन फ्रुटच्या आठशे रोपातून सुमारे सात लाखांपर्यंतची कमाई होत आहे. त्यांनी खजूरची 80 झाडे लावली असून अजून काही दिवसात त्यातूनही उत्पादन मिळणार आहे. म्हणजेच उत्पन्नात अजून वाढ होणार आहे.

विजयाताई यांच्या मते त्यांनी शेती करून त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्यांची दोन्ही मुले नोकरींनिमित्ताने बाहेर राहत असतात. मात्र तरीदेखील विजयाताई आपल्या एकट्याच्या जोरावर शेती व्यवसायात चांगले यश संपादन करत आहे. निश्चितच विजयाताई यांनी शेतीमध्ये मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणा देणारे आहे.