Successful Farmer: नांदच खुळा..! पट्ठ्या चक्क 2 लाख रुपये किलो विकले जाणारे मशरूम करतो उत्पादीत, होते करोडोची उलाढाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील देशातील नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये शेतकरी बांधवांना अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आपला उदरनिर्वाह भागवणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच वर्षानुवर्षे सातत्याने शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव आता कर्जबाजारी झाला आहे. यामुळे देशातील अनेक शेतकरी बांधवांना आता आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय देखील घ्यावा लागत आहे.

कृषीप्रधान देशात शेतीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी राजाने आत्महत्या करावी ही निश्चितच भारतासारख्या महान देशाला एक काळिमा फासणारी बाब आहे. मात्र जरी असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी बांधव आहेत जे आपल्या नेत्रदीपक कशामुळे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होत आहेत.

देशातील अनेक शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल घडवून आणत आहेत. विशेष म्हणजे शेतीत केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत असून आता शेतकरी बांधव शेतीतुन लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.

राजस्थान मधील एका शेतकरी बांधवांने देखील काळाच्या ओघात बदल करत मशरूम शेतीच्या (Mushroom Farming) माध्यमातून करोडो रुपये उलाढाल करण्याची किमया साधली आहे. राजस्थानमधील सीकर येथील शेतकरी मोटाराम शर्मा तीन दशकांपासून मशरूमची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. आजच्या काळात ते सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

मोटाराम विविध प्रकारचे मशरूम उत्पादित करत आहेत, ज्यामध्ये बटन मशरूम, सिटेक मशरूम आणि दुधाळ मशरूम यांचा समावेश आहे. त्याचे मशरूम ₹ 100 प्रति किलो ते ₹ 200000 प्रति किलो पर्यंत विकले जाते.

2010 मध्ये, गणोडर्मा मशरूमची लागवड करणारे ते भारतातील पहिले शेतकरी बनले. यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी त्यांना पुरस्कार देखील दिला आहे. याशिवाय त्यांना कृषीरत्न पुरस्कार, कृषी सम्राट पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांना मशरूम किंग ही पदवीही देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सध्या शेतकरी मशरूमच्या लागवडीतून कितीतरी पट अधिक नफा कमवत आहेत.  सध्या बाजारात त्याची मागणी झपाट्याने वाढत आहे.

तसेच, त्याच्या लागवडीसाठी मोठ्या गुंतवणूकीची किंवा मोठ्या जागेची आवश्यकता नसल्याने शेतकरी बांधवांसाठी हा व्यवसाय निश्चितच फायद्याचा ठरत आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांनी मशरूम लागवड करण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांना मशरूमची शेती करायची असेल त्यांनी त्यांच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रांना भेट देऊन मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.