Successful Woman Farmer: रुपाली ताईचा नांदच खुळा…! रुपाली ताईने शेती करण्याचा निर्णय घेतला अन नशीबचं पलटल, ताईंची आज लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Woman Farmer: भारत हा प्रतिभावान लोकांचा देश आहे. भारतीय आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. शेती व्यवसायात (farming) देखील भारतीयांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय नारी शक्ती देखील जगासमोर एक वेगळे उदाहरण मांडत आहे.

आजच्या काळात भारतीय स्त्री शेती व्यवसायात देखील अग्रेसर झाली आहे. देशातील ग्रामीण भागातील महिला आता कृषी क्षेत्रात पुढे येत आहेत. विशेष म्हणजे शेतीव्यवसायात भारतीय स्त्री रोजाना नव-नवीन यशोगाथा लिहित आहेत.

अशाही काही महिला शेतकरी (woman farmer) आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता शेतीत चांगले नेत्रदीपक यश संपादन केले असून लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. शेती व्यवसायात चांगले यश मिळवून भारतीय स्त्रियांनी आता पुरुषांना देखील लाजवले आहे आणि समाजात आपले एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे.

भारतीय स्त्रियांनी आता स्वत:चा सातबारा दांडगा केला आहे तसंच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील भक्कम केली आहे. अशीच एक झारखंड राज्यातील महिला शेतकरी (farmer) आहे रुपाली मंडी. रुपाली ताईंनी आपल्या अभूतपूर्व यशामुळे पंचक्रोशीत मोठा मान सन्मान कमावला आहे.

रूपालीताई पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील झलभूमगढ ब्लॉकमधील रावतारा गावातील रहिवासी शेतकरी आहे. रुपाली ताईंचे पती बंगळुरूमध्ये राहून रोजंदारीचे काम करायचे, पण रुपालीताईला शेतीतुन चांगले उत्पन्न मिळू लागल्याने आता तिचा नवरा देखील गावी परतला आहे आणि आता हे दोघं नवरा बायको एकत्र शेती करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

खरं पाहता कोरोनाने अनेक लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. रुपालीताईच्या आयुष्यात देखील कोरोनाने बदल घडवून आणला आहे. खरं पाहता कोरोनाच्या काळात त्यांचे पती बंगलोर हुन परत आले होते, त्यावेळी त्यांच्या दोन्हीकडे रोजगार नव्हता.

यानंतर, रूपाली तिच्या गावातील जोहर प्रकल्पाद्वारे चालवल्या जाणार्‍या पीजी समूहाचा एक भाग बनली आणि तिने तिच्या 40 डेसिमल जमिनीत शेती करण्याचा निर्णय घेतला. जिथे तिने पारंपारिक पिके आणि भाजीपाला (vegetable farming) पिकवायला सुरुवात केली. पण त्यातून फारसा फायदा झाला नाही तर रूपालीने ठरवले की पारंपारिक शेती करण्याऐवजी ती उच्च मूल्याची पिके (cash crops) आणि भाजीपाला उत्पादीत करणार.

यानंतर त्यांनी 110 दशांश जमिनीवर बहुपीक घेण्यास सुरुवात केली. या शेतीतून त्यांना अधिक आर्थिक फायदा झाला. हे काम करताना त्यांना सरकारी JSLPS अंतर्गत सुरू असलेल्या जोहर प्रकल्पाचे सहकार्य लाभले. आज रुपाली आणि त्यांचे पती या परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात.

शेतीमध्ये मार्गदर्शनाचा लाभ मिळेल

रुपालीला जोहर प्रकल्पातून 62 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. याच्या मदतीने त्यांनी पूर्ण मेहनतीने शेती केली. यासोबतच तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक माहितीचा पूर्णपणे अवलंब करून काम करण्यात आले. यामुळे त्यांना 13 हजार रुपयांचा नफा झाला.

रुपालीसोबत सध्या आणखी तीन महिला टीम म्हणून काम करतात. यावेळी त्यांनी 70 डेसिमलमध्ये लागवड केली होती, त्यात त्यांनी वाटाणा, सिमला मिरची, गरम मिरी आणि गाजराची लागवड केली. याशिवाय उर्वरित 80 डेसिमल जमिनीत त्यांनी इतर भाज्यांची लागवड केली आहे.

लखपती बनून महिलांसाठी बनले आदर्श 

या भाज्या विकून तीन लाख 56 हजार रुपये कमावल्याचे रूपालीने सांगितले. अशा प्रकारे ती आता लखपती शेतकरी बनली आहे. आता रुपाली सांगते की, तिला कधी वाटलं नव्हतं की शेतीतून इथपर्यंत पोहोचू शकेन. आज अनेक लोक त्यांची शेतं बघायला येतात आणि त्यांची प्रेरणा घेत शिकण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे ती ग्रामीण महिलांसाठी एक आदर्श ठरली आहे.