Tractor News : बातमी कामाची! शेतकऱ्यांनो ‘हा’ छोटा ट्रॅक्टर शेतीकामासाठी ठरतोय अव्वल, किंमत आणि विशेषता वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor News : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. मजूरटंचाई दिवसेंदिवस भेडसावत असल्याने आता शेतकरी बांधव यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे करत आहेत.

आता शेतीमध्ये शेतकरी बांधव ट्रॅक्टरचा (Tractor) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ट्रॅक्टर हे एक असं कृषी यंत्र आहे ज्याच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना पूर्वमशागतीपासून ते अगदी काढणीकरेपर्यंत आणि काढणीपासून ते शेतमाल बाजारपेठेत नेईपर्यंत सर्वत्र उपयोगाचे ठरत आहे.

मित्रांनो आता छोट्या ट्रॅक्टरचा देखील मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. छोट्या ट्रॅक्‍टरच्या (Mini Tractor) साहाय्याने शेतकरी बांधव बागकाम मोठ्या आरामात करत आहेत. फळबागांमध्ये फवारणी साठी देखील आता छोटे ट्रॅक्टर (VST Mini Tractor) उपयोगाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका छोट्या ट्रॅक्टर ची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

VST Tractor Tillers (VST) या भारतातील सर्वात जुन्या ऑटोमोबाईल कंपनीच्या एका छोट्या ट्रॅक्टर विषयी जाणून घेणार आहोत. ही कंपनी लहान शेतकऱ्यांसाठी एकापेक्षाएक वरचढ ट्रॅक्टर बनवते. ही कंपनी गेल्या 110 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करत आहे.

या कंपनीचा Vst 932 शक्ती सुपर ट्रॅक्टर (Vst shakti 932 tractor) लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम ट्रॅक्टर आहे. VST 932 SUPER हा 30 HP चा ट्रॅक्टर आहे जो भारतीय शेतकऱ्यांमध्ये त्याच्या उत्कृष्ट देखाव्यासाठी, उच्च इंजिन क्षमता आणि कार्यक्षम मायलेजसाठी लोकप्रिय आहे. चांगल्या इंजिन क्षमतेमुळे ते बराच काळ शेतात काम करू शकते.

स्टेरिंग :- VST 932 सुपर ट्रॅक्टर पॉवर स्टीयरिंगसह येतो. त्यात आरामदायी आसन आहे. यात ऑईल ब्रेक आहेत. तसेच ट्रॅक्टरचा प्लॅटफॉर्मही बराच मोठा आहे.

ट्रान्समिशन :- व्हीएसटी 932 सुपर ट्रॅक्टरमध्ये सिंक्रोमेश प्रकारचे ट्रान्समिशन दिले जाते. यात 9 फॉरवर्ड गीअर्स आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत. या ट्रॅक्टरचा कमाल वेग 1.79 ते 22.03 किमी प्रतितास आहे. या ट्रॅक्टरमध्ये डबल क्लच देण्यात आला आहे.

Vst 932 चे इंजिन :- या ट्रॅक्टरमध्ये 30 HP, 1758 CC आणि 4 सिलेंडर इंजिन आहे. व्हीएसटी 932 सुपर ट्रॅक्टरमध्ये वॉटर कूल्ड कूलिंग स्थापित केले आहे. याशिवाय, हे ड्राय टाइप एलिमेंट एअर फिल्टरसह येते.

हायड्रॉलिक :- VST 932 सुपर ट्रॅक्टरची हायड्रॉलिक क्षमता 1250 kg आहे.

टायर :- व्हीएसटी 932 सुपर ट्रॅक्टरमध्ये ४ डब्ल्यूडी टायर दिलेले आहेत. यामध्ये समोरचा टायर 6.0 x 12 आणि मागील टायरचा आकार 9.5 x 20 आहे.

PTO :- VST 932 सुपर ट्रॅक्टरची PTO पॉवर 25 HP आहे. यात 25 लिटरची डिझेल टाकी आहे.

Vst शक्ती 932 ट्रॅक्टर किंमत :- भारतीय बाजारपेठेत VST 932 सुपर ट्रॅक्टरची किंमत 5.40 ते 5.70 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही किंमत राज्यानुसार बदलू शकते. अधिक तपशिलांसाठी तुमच्या जवळच्या VST ट्रॅक्टर डीलरशी संपर्क साधा.