Type Of Soil: कोणती माती पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता असते फायद्याची? कोणती माती जास्त सुपीक समजली जाते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Type Of Soil:- माती आणि शेती यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. माती जेवढी सुपीक असेल तेवढे पिकं भरघोस उत्पादन देतात. त्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मातीचे आरोग्य म्हणजेच मातीची सुपीकता टिकवणे खूप गरजेचे असते. त्यातल्या त्यात मातीच्या प्रकारानुसार विचार केला तर काही प्रकारांमध्ये मातीच्या सुपीकतेला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य द्यावे लागते व त्या पद्धतीने व्यवस्थापन देखील करावे लागते.

जेव्हा आपण शेतामध्ये पाहतो तेव्हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी एका प्रकारची माती दिसून येत नाही. अगदी तुम्ही दहा ते पंधरा किलोमीटरचा टप्पा देखील ओलांडला तरी तुम्हाला मातीत बदल दिसून येतो इतकी मातीमध्ये विविधता आहे. मातीच्या बाबतीत आपण म्हणतो काळी ची जमीन ही चांगल्या उत्पादनासाठी खूप उत्तम मानले जाते व तिलाच आपण रेगुर मुर्दा असे देखील म्हणतो.

याच अनुषंगाने जर विचार केला तर आपण मातीचे जे काही प्रकार आहेत त्या सर्व प्रकारांचे वैशिष्ट्ये हे वेगवेगळे असते. साधारणपणे भारताचा विचार केला तर भारतामध्ये गाळाची, लाल आणि पिवळी, रेगुर अथवा काळी लॅटराइट आणि डोंगर उताराची माती असे साधारणपणे प्रकार येतात. त्यामुळे या लेखात आपण मातीच्या या महत्त्वपूर्ण प्रकारांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

 भारतातील मातीचे प्रमुख प्रकार

1- गाळाची माती गाळाच्या मातीला प्रामुख्याने सुपीक माती किंवा सुपीक मृदा म्हणून ओळखले जाते. नदीच्या माध्यमातून पाण्यासोबत जो काही गाळ वाहून आणला जातो त्यापासून ही माती तयार होते. साधारणपणे ही माती भारतामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा तसेच सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये व हिमालयातील ज्या काही प्रमुख नदी प्रणाली आहेत त्या ठिकाणी आढळून येते. भारतातील पश्चिम बंगाल, हरियाणा, आसाम आणि पंजाब, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये  आणि पूर्व किनारपट्टीचा जो काही मैदानी भाग आहे त्या ठिकाणी गाळाची माती आढळते.

2- लाल आणि पिवळी माती ही माती ग्रॅनाईट पासून बनलेली असून तिचा रंग लाल असतो. या मातीचा रंग लाल असण्यामागील प्रमुख कारण म्हणजे या मातीमध्ये असलेल्या आग्नेय आणि रूपांतरित खडकांमधील जे काही लोहाचे प्रमाण असते त्यामुळे मातीचा रंग लाल असतो.

हे माती भारतामध्ये द्वीपकल्पीय पठाराचा जो काही पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भाग आहे त्या ठिकाणी ही माती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. भारतातील आंध्र प्रदेश, ओरिसात तसेच छोटा नागपूरचे पठार, तामिळनाडू तसेच दक्षिण पूर्व महाराष्ट्र व गोवा इत्यादी राज्यांमध्ये ही आढळते.

3- रेगुर मृदा ज्वालामुखीचा जो काही लाव्हारस असतो त्यापासून ही माती तयार होते व यामुळेच या मातीचा रंग काळा असतो. कापूस पिकासाठी ही माती खूप महत्त्वाची समजली जाते.

4-पर्वतीय मृदा पर्वतीय वातावरणानुसार या मातीची निर्मिती बदलत असते. नदी खोऱ्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी ही माती चिकन माती व गाळयुक्त असते पण वरच्या उतारा वरती खडबडीत कणांमध्ये तयार होते. नदीच्या खोऱ्यात असेल तर त्याच्या खालच्या भागात विशेषता नदीच्या पायऱ्या त्यामध्ये ही सुपीक असते. या प्रकारच्या मातीमध्ये मका किंवा भात, फळ पिके व चारा पिके प्रामुख्याने घेतली जातात.

5- वाळवंटातील माती वाळवंटा मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता असते व या ठिकाणी दिवसा उच्च तापमान असल्यामुळे खडक विस्तारतात आणि रात्री अति थंड तापमानामुळे ते अंकुचन पावतात. या प्रक्रियेमुळे राजस्थानमध्ये वाळवंटी माती मोठ्या प्रमाणावर तयार झाली असून ही पंजाब आणि हरियाणाचा दक्षिण पश्चिम भाग आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळते.

6-लॅटराईट माती ज्या ठिकाणी जास्त पाऊस आणि जास्त तापमान असते अशा भागांमध्ये ही माती विकसित होते. ही माती प्रामुख्याने भारतात तामिळनाडू, महाराष्ट्र तसेच कर्नाटक, आसाम आणि केरळ  व मेघालय राज्यातील डोंगराळ भागांमध्ये आणि मध्य प्रदेश व व ओरिसासारख्या कोरड्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळते.