खरं काय! सेंद्रिय शेती करून या अवलिया शेतकऱ्याने मिळवले रेकॉर्डतोड उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :-सध्या संपूर्ण देशात अनिर्बंधपणे रासायनिक खतांचा वापर (Unrestricted use of chemical fertilizers) सुरू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमीन नापीक (Farmland barren) होण्याचा धोका देखील आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर सुरू केला.

सुरुवातीला रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाले मात्र आता रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर होत असल्याने उत्पादनात घट होत आहे शिवाय जमीन नापीक होत आहे.

यामुळेच आता देशात अनेक शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. फक्त सेंद्रिय शेतीच करत नाही तर यशस्वी सेंद्रिय शेती करून चांगले उत्पन्न देखील मिळत आहेत.

आज आपण सेंद्रिय शेती करून दर्जेदार गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या नागपूर येथील एका शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success Story) जाणून घेणार आहोत.

अजय लाडसे यांनी सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) गव्हाची शेती केली आणि विशेष म्हणजे यातून एकरी 23 क्विंटल उत्पादन देखील प्राप्त केले. शेती क्षेत्रात काळाच्या ओघात परिवर्तन घडवून आणणे अनिवार्य आहे.

शेतीमध्ये जर अहोरात्र काबाडकष्ट केले, आधुनिकतेचा कास धरला, योग्य नियोजन केले तर शेतीमधून दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते. याचेच एक जिवंत उदाहरण आहेत अजय.

अजय यांनी देखील आपल्या जिद्दीच्या आणि नियोजनाच्या जोरावर जैविक पद्धतीने गव्हाची शेती (Wheat Farming) करून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले आहे.

राज्यात रब्बी हंगामात (Rabbi Season) मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते. असे असतानाही नागपूर मधील शेतकरी रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गहु या पिकाकडे (Wheat Crop) पाठ फिरवत आहेत.

त्याचे प्रमुख कारण म्हणजे, गव्हाच्या उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे शिवाय मजूरटंचाई आता प्रकर्षाने जाणवू लागल्याने शेतकरी बांधवांना गहु पिकासाठी अधिक पायपीट करावी लागते. म्हणून या परिसरातील शेतकरी आता नगदी पिकांचा लागवडीस विशेष प्राधान्य देताना बघायला मिळत आहेत.

मात्र, अजय यांनी या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून गहु पेरणीचा निर्णय घेतला. अजय यांनी सव्वादोन एकर क्षेत्रावर महाबीजचे बायोफोर्टिफाईड सरदार या बियाण्याची पेरणी केली.

पेरणी करताना त्यांनी बीजप्रक्रिया केली. याकामी त्यांना कृषी विभागाचे देखील अनमोल सहकार्य लाभले. कृषी विभागाच्या सल्ल्यानेच त्यांनी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर केला.

शेवटी कष्टाची पराकाष्टा करत ज्या भागात शेतकरी गहू पिकाकडे पाठ फिरवत आहेत त्याच भागात अजय यांनी विशेष म्हणजे सेंद्रिय शेती करत गहू पिकातून एकरी 23 क्विंटल दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. निश्चितच अजय यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यास हातभार लावणारं असेल.