7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA 4% ने वाढवल्यानंतर आता सरकार देणार ‘हे’ गिफ्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : भारत सरकारने नुकताच महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी आता सरकार (Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) आणखी एक मोठी बातमी (Big news) देणार आहे.

सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. सरकार या आठवड्यात सरकारी अधिकाऱ्यांना बढती देऊ शकते. त्यासाठी विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला

केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा ग्रुप ए च्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांची भेट घेतल्यानंतर प्रमोशनबाबत ही घोषणा करण्यात आली आहे.

कार्मिक राज्यमंत्री सिंह यांनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला नियमानुसार पदोन्नतीची प्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन दिले आहे. पदोन्नतीबाबत कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

प्रशिक्षण अनिवार्य केले जाईल

यामध्ये प्रमोशनपूर्वी अधिकाऱ्यांना एक वर्ष ते 18 महिन्यांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना लवकरात लवकर प्रमोशन दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. सिंह म्हणतात की भविष्यातील पदोन्नती देखील सुव्यवस्थित केल्या जातील.

डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ केली आहे. AICPI निर्देशांकावर आधारित, 4 टक्के वाढ सरकारने केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए आता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 जुलै 2022 रोजी 8,089 कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले होते.

यापैकी 4,734 केंद्रीय सचिवालय सेवा (CSS), 2,966 केंद्रीय सचिवालय स्टेनोग्राफर सेवा (CSSS) आणि 389 केंद्रीय सचिवालय लिपिक सेवा (CSCS) हे आहेत.