Ahmednagar Breaking : अखेर राम शिंदे आमदार झाले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Vidhan Parishad Election Live: अहमदनगर जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळाला आहे, कारण आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार व कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांचा विजय झाला आहे.

राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज झाली, विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार यावर चर्चा रंगत होत्या.

शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत होते,

राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं . तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत होते

संध्याकाळी सर्वांचे मतदान होताच भाजप उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या निवासस्थानी जल्लोषाची तयारी करण्यात आली होती.

माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली होती,राम शिंदे यांच्या आई भामबाई शिंदे यांच्याकडून देव पूजा करण्यात आली

राम शिंदे यांची विधान परिषदेत वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी मध्ये आनंदाचं वातावरण असून 22 तारखेला कर्जत-जामखेड येथे मोठा जल्लोष करणार असल्याचे राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.