BSNL Recharge Plan : BSNL चे प्लॅन महाग झाले, काय बदल झाला? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Recharge Plan : BSNL ने नुकतेच तीन प्री-पेड प्लॅन (Pre-paid plan) लाँच केले आहेत. त्यातच BSNL ने अचानक सगळे प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे BSNL ग्राहकांना (customers) त्याचा मोठा फटका बसला आहे.

एकीकडे पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि घरगुती गॅसचे (Gas) दर वाढल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्सच्या दरात बदल केल्याने पुन्हा एकदा त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.

BSNL Rs 99 प्रीपेड प्लॅन: आधी काय आणि आता काय?

BSNL पूर्वी 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह 22 दिवसांची वैधता (Validity) ऑफर (Offer) करत असे. पण आता हाच प्लान 18 दिवसांच्या सेवेची वैधता आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येईल. पूर्वी प्रतिदिन 4.5 रुपये दर होता, तो आता 5.5 रुपये झाला आहे. म्हणजेच, तुम्हाला दररोज 1 रूपया अधिक द्यावे लागतील.

BSNL Rs 118 प्रीपेड प्लॅन: आधी काय आणि आता काय?

BSNL च्या 118 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 26 दिवसांची वैधता पूर्वी मिळत होती, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत PRBT सेवा उपलब्ध होती. BSNL ने ही योजना 20 दिवसांची कमी वैधता वगळता समान फायद्यांसह पुन्हा लाँच केली आहे.

म्हणजेच प्लॅन वापरण्याचा दैनंदिन खर्च 4.53 रुपयांवरून 5.9 रुपये झाला आहे. म्हणजेच दररोज 1.6 रुपयांचा फरक आहे.

BSNL Rs 319 प्रीपेड प्लॅन: आधी काय आणि आता काय?

बीएसएनएल 75 दिवसांची सेवा वैधता, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 300 एसएमएस आणि 10GB डेटासह 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत असे. नवीन प्लॅनचे फायदे समान आहेत, परंतु वैधता 65 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

म्हणजे आधी या प्लॅनची ​​किंमत 4.25 रुपये प्रतिदिन होती, जी वाढून 4.9 रुपये झाली आहे. याचा अर्थ दररोज 65 पैशांची उडी घेतली आहे.