Business Idea : 10 हजारात सुरू करता येतात ‘हे’ व्यवसाय! दरमहा होईल बक्कळ कमाई, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदची बातमी आहे. सध्या असे काही व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी किमतीत सुरु करू शकता. ज्यातून तुम्ही लाखो रुपये कमाई करू शकता.

समाजात अशी अनेक यशस्वी उदाहरणे पाहायला मिळतात, ज्यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून आज स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. असेच काही व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी किमतीत सुरु करून तुमचे आयुष्य बदलू शकता.

पाणी पुरवठादार

तुम्ही 10,000 रुपयांपासून हा व्यवसाय सुरू करू शकता. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही हंगामात या व्यवसायाची मागणी कमी होत नाही. यासाठी जास्त नाही तर फक्त दोन लोकांची आवश्यकता असेल. पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यापूर्वी, तुम्हाला फोनवरून ऑर्डर बुक करावी लागणार आहे. या व्यवसायात रोख पेमेंट केले तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून नफा मिळेल.

मोबाईल रिपेअरिंग

हा खेड्यापासून लहान शहरापर्यंत एक उत्तम व्यवसाय असून तुम्ही तो कुठूनही रिपेअरिंग कोर्स करू शकता. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ३ ते ६ महिन्यांचा कालावधी लागेल. हा व्यवसाय चालू करून तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

कार वॉश शॉप

अलीकडच्या काळात स्वतःची कार घेण्याची क्रेझ निर्माण झाली असून आजकाल प्रत्येक घरात बाईक किंवा कार ठेवण्याचा ट्रेंड तयार झाला आहे. स्वतःहून गाडी धुवायला कोणाकडे वेळ नसतो. यासाठी अनेकजण आपली कार वॉशिंग स्टोअरमध्ये जाऊन धुवून घेतात. जर तुम्ही हा व्यवसाय केलात तर अगदी कमी भांडवलात तुम्ही तो चालू करू शकता. तुमच्याकडे थोडी जागा असल्यास तर तुम्ही कार वॉशिंग सेंटर चालू करू शकता.

योग प्रशिक्षक

योग प्रशिक्षकांची मागणी झपाट्याने वाढली असून योगामुळे तुम्ही अनेक प्रकारचे आजार आणि तणावापासून मुक्ती मिळवता येते. ताण वाढवणाऱ्या सर्व तंत्रांमध्ये योग हे सर्वात उत्तम मानले जाते. सध्या त्याचा चांगला परिणाम जगभरात पाहायला मिळाला आहे. योग प्रशिक्षकांना भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी असते. हा व्यवसाय म्हणून केला तर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही.

नाश्त्याचे दुकान

या व्यवसायाला खूप मागणी असून सकाळी अनेकदा लोकांना ऑफिसमधून बाहेर पडण्याची खूप घाई असते. असे अनेकजण आहेत जे आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. तुम्ही हे काम अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सुरू करू शकता. यासाठी सुरुवातीला केवळ 20 ते 25 हजार रुपये खर्च येऊ शकतो. यासाठी तुम्हाला एक योग्य जागा लागणार आहे.