Climate Change: कृषी शास्त्रज्ञांचा अनमोल सल्ला!! वाढत्या तापमानामुळे संत्राबागेची गळती; ह्या उपाययोजना करा आणि नुकसान टाळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. विशेषता विदर्भ आणि मराठवाड्यात (Marathwada) तापमानाने त्राहिमाम माजवला आहे.

जाणकार लोकांच्या मते तापमानात (Temperature) आगामी काळात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील (Vidarbh) फळ बागायतदार विशेषता संत्रा बागायतदार (Orange gardener) हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे.

वाढत्या तापमानामुळे आंबिया बहारातील संत्र्याच्या बागा (Orange orchards in Ambia Bahar) क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

संत्राच्या लहान फळाची सध्या गळती होत आहे. नवीन कोवळी फळेदेखील वाढत्या उन्हामुळे करपत आहेत. यामुळे संत्राच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करणे अती महत्‍वाचे ठरत आहे.

विदर्भात उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे की मागील वर्षी लागवड केलेल्या संत्राच्या बागा करपू लागले आहेत. यामुळे कवळ्या संत्राच्या झाडाची पाने गळू लागली आहेत.

यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. यासाठी नवीन झाडांच्या बुडाजवळ गवत,पालापाचोळा,कुटार, याचा दहा सेंटिमीटर एवढा थर लावावा.

रोपाच्या तीनही बाजूने शेडनेटचे आच्छादन करावे किंवा तुराट्या लावाव्या. झाडाच्या बुडाजवळ पाण्याचा माठ ठेवावा व त्याला छिद्र पाडावे.

यामुळे झाडाला सतत पाणी मिळत राहते आणि बाष्पीभवन देखील कमी प्रमाणात होते. कृषी तज्ञांच्या मते, बाष्पीभवन व पर्णोत्सर्जन रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट फवारणी करावी.

100 लिटर पाण्यासाठी एक किलो पोटॅशियम नायट्रेट हे प्रमाण घेऊन दर 25 दिवसांनी त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बाष्परोधकाचा वापर करून पर्णोत्सर्जन कमी करता येऊ शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे.

यासाठी 2 टक्के तीव्रतेची केओलीनची किंवा 1 टक्का तीव्रतेची पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात.

10 वर्षांखालील झाडाला ठिबकद्वारे 144 ते 178 लिटर व त्यापेक्षा अधिक मोठी असलेल्या झाडांना 160 ते 198 लिटर पाणी देणे आवश्यक आहे.

वाढत्या तापमानामुळे संत्रा बागेतील लहान फळे काळे डाग पडून गळत असतील तर यासाठीदेखील कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

कृषी तज्ञांच्या मते यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 300 ग्रॅम व 100 लिटर पाणी घेऊन द्रावण तयार करा आणि त्याची फवारणी करा.

कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, फळबागायतदार यांनी आपल्या बागेत 100 मायक्रोन काळ्या रंगाच्या पोलिथीनचे आच्छादन केले पाहिजे.

असे केल्यास फळबागेतून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते तसेच तण वाढत नाही त्यामुळे फळबागांना पाणीदेखील कमी लागते. यामुळे सहाजिकच फळबागांसाठी अधिक काळ पाणी पुरणार आहे.