शहरातील पोलीस कवायत मैदानावर कोविड सेंटरची उभारणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे रुगणांवर उपचारासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

यातच नगर शहरातील पोलीस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरची उभारणी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून केली आहे.

रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप हे सेंटरसाठी सहकार्य करणार आहेत.

आवश्यकतेनुसार बेड वाढविण्यात येणार असून, सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. जिल्हाभरातून कोरोना रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत.

त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

दरम्यान कोविड सेंटरच्या उदघाटनप्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|