अहमदनगर जिल्ह्यात डिझेल चोरीचे रॅकेट उघडकीस येणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- औरंगाबाद राज्य महामार्गावरील पेट्रोलपंप, धाबे या ठिकाणी मोठी वाहने रात्री जेवणासाठी व मुक्कामासाठी थांबत असतात या वाहनांमधून डिझेलची चोरी तसेच जबरी चोरी आरोपी करत असल्याचा माहिती मिळाली आहे. यावरून डिझेल चोरांचे फार मोठे रॅकेट सक्रिय असण्याचा संभव असून यापूर्वीही रात्रीच्यावेळी महामार्गावर मोठ्या वाहनातून डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

हे चोरीचे डिझेल निम्म्या दराने विकत असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहे हे रॅकेट कोण चालवत होते? याला आशीर्वाद कुणाचा? हे स्वस्तातले डिझेल कोण खरेदी करत होते? या सर्वांचा तपास पोलिसांनी करावा,अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहे.

मोरयाचिंचोरे परिसरात सोमवारी सापडलेल्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना सोनई परिसरातील तरुण मंडळ व सोनई पोलिसांनी पकडले.

या अटक केलेल्या आरोपीवर सोनई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे यांच्या फिर्यादीवरून २१०/२०२१ भादंवि कलम ३९९, ४०२, ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करत आहे.

न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.आरोपी राहत असलेल्या ठिकाणाहून डिझेलचे ३ मोठे पिंप हस्तगत करण्यात आले.