Farming Tips: उडीद लागवड केली आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या आणि कमवा बक्कळ नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करत असतात.

आज आपण उडीद लागवडीविषयी (Urad cultivation) काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. उडद हे एक कडधान्य पीक (Cereal crop) आहे.

हे असे पीक आहे, ज्यामध्ये पोषक तत्वांचा भरपुर साठा आहे. उडीद डाळ अनेक पदार्थांच्या रूपात सेवन केले जाते. यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, नियासिन, थायामिन आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात आढळतात.

उडीदचे पीक (Urad Crop) अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असते. या पिकाला पूर्णपणे विकसित होण्यासाठी 60 ते 65 दिवसाचा कालावधी लागत असतो, यामुळे उडीद लागवडीतून शेतकऱ्यांना कमी वेळेत चांगला व दुप्पट नफा मिळतो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी उडीद लागवडीशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. चला तर मग त्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.

उडीद लागवडीविषयी काही महत्वाच्या बाबी

»उडीद लागवडीसाठी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की, शेतकरी बांधवानी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर उडीद पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते आणि खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक उत्पन्न त्यांना प्राप्त होईल.

»उडीदची लागवड शक्‍यतो उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगाम उडीद लागवडीसाठी योग्य आहे. एप्रिलचा पहिला आठवडा लागवडीसाठी योग्य काळ मानला जातो.

»शास्त्रज्ञांनी सांगितले की, 30 ते 40 डिग्री दरम्यानचे तापमान उडीद लागवडीसाठी योग्य मानले जाते.

»कृषी तज्ज्ञांच्या मते, उडीद लागवडीसाठी चिकणमाती असलेली जमीन सर्वात योग्य मानली जाते, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उडीद लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.

»उडीद पिकाला जमिनीतील आर्द्रतेनुसार पाणी देण्याचा सल्ला दिला जातो. जर माती खूप कोरडी असेल तर आठवड्यातून दोनदा पाणी द्यावे. अन्यथा 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

»रोप ते रोप अंतर 10 सेमी ठेवावे. तसेच, 4 ते 6 सेंटीमीटर खोलीवर बियाणे पेरणी करावी असा सल्ला दिला जातो.

»या पद्धतीने शेतकरी बांधवानी उडीद पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितच अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या उडीद पिकातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई होऊ शकते.