अखेर कुकडी आवर्तनाचा प्रश्न मिटला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होता. मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली.

यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

आमदार पाचपुते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः, आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. यावेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले, तर शेतकऱ्यांचे कधी ही न भरून येणारे नुकसान आदी बाबी जयंत पाटील यांच्या समोर मांडल्या.

कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावेच लागेल ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे या विषय लांबला त्या याचिकाकर्त्याना आमदार अतुल बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील स्वतः त्यांच्याशी बोलले. पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉकचे पाणी वापरात आणले जाईल.

पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लागेल. हा कुकडी प्रकल्पातील सर्वांचाच मोठा फायदा आहे. आपण सहकार्याची भूमिका घ्यावी, असे याचिकाकर्त्यांसस अश्वसित केले. त्यामुळे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

न्यायालयाचा निकाल सकारात्मक असेल, कुकडीचे आवर्तन सुटून सर्वांना पाणी मिळेल. डिंभे ते माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. हा बोगदा झाला तर एक आवर्तनाएवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होऊन सर्वांनाच न्याय मिळेल, असेही पाचपुते यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|