अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केली श्रीरामपूर रेल्वे स्थानकाची पायाभरणी ! असा होईल कायापालट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर विभागातील श्रीरामपूर ( बेलापूर) सह अन्य तीन रेल्वे स्थानकात येत्या सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टेशन अपग्रेडेशन कामाची पायाभरणी करण्यात आली.

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल. आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल.

एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकतो, यादृष्टीने कामे होणार आहेत.अमृत भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास करणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.

या स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ४ स्थानकांचा मोठ्या प्रमाणावर कायापालट आणि पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये समावेश आहे. मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील बेलापूर, गाणगापूर, दुधी आणि जेऊर ही स्थानके आहेत.

बेलापूर स्टेशन साठी ३१ कोटी ९६ लाख, गाणगापूर २० कोटी ७८ लाख, दुधणी २१ कोटी ८६ लाख, जेऊर १४ कोटी ७३ लाख इतकी रक्कम प्रस्तावित आहे. यामधून बेलापूर रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे.

विविध सुविधांसह स्टेशनवर प्लॅटटफार्मची लांबी वाढवली जाईल. बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अतिरिक्त एस्केलेटरची तरतूद आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना जागतिक दजार्गाच्या सुविधा बेलापूर स्थानकाता मिळणार आहेत.

असा होईल कायापालट
दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीची सुधारणा, पार्किंग सुविधा, पादचारी मार्ग, बगीचा, १२ मीटर रुंदीचा पादचारी ओव्हरब्रिज, आच्छादित प्लॅटफॉर्म, दिव्यांगांसाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, सुधारित प्रसाधनगृहे, प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन, निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅनचा वापर,दिव्यांगांसाठी फ्लोअरिंग बसवणे ही कामे होणार आहेत.