LIC Dhan Varsha Plan : कमी गुंतवणुकीत मिळतोय 93 लाख रुपयांचा लाभ, असा करा अर्ज

LIC Dhan Varsha Plan : सध्याच्या काळात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेकांचा भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC वर अनेकांचा अजूनही खूप विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही.

आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही कंपनी सतत अनेक आकर्षक आणि भन्नाट योजना घेऊन येत असते. त्यापैकी एलआयसीची धनवर्ष योजना ही अशीच एक योजना आहे. यामध्ये हमखास परतावा मिळतो. तसेच इतर फायदेही मिळतात.

या योजनेअंतर्गत तुम्हाला गुंतवणुकीसाठी 2 पर्याय मिळतात. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी पहिला पर्याय निवडला तर तुम्हाला 1.25 पट परतावा मिळेल.

तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला 10 पट पर्यंत जोखीम संरक्षण मिळते. समजा तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम खरेदी केला असेल ज्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यांनी ठरवलेल्या नॉमिनीला सुमारे एक कोटी रुपये मिळतात.

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह 10 लाख रुपयांच्या मूळ विमा रकमेसह 35 वर्षांच्या वयात पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला एकाच वेळी सुमारे 8,74,950 रुपये मिळतील.

जर एखाद्या पॉलिसीधारकाचा 10 व्या वर्षी मृत्यू झाला तर नॉमिनीला 91,49,500 रुपये मिळतात. तसेच पॉलिसीधारकाचा 15 व्या वर्षी मृत्यू झाला तर नॉमिनीला 93,49,500 रुपये मिळतात. जर विमाधारक मुदतपूर्तीपर्यंत असेल तर त्यांना 16 लाख रुपये मिळतात.