अकोल्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग!! ड्रॅगनफ्रुटची शेती केली अन अवघ्या दोन एकरात घेतलं लाखोंच उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story : विदर्भात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधवांना (Farmers) शेती व्यवसायात (Farming) मोठं नुकसान सहन करावे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) दिवसेंदिवस घट देखील होतं आहे.

जमिनीचा पोत देखील विदर्भात (Vidarbha) कमालीचा हलका आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना (Vidarbha Farmers) अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे बघायला मिळते.

यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल करणे अनिवार्य झाले आहे. आता येथील शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची शेती करणे गरजेचे झाले आहे.

येथील शेतकऱ्यांनी आता पीक पद्धत्तीत बदल करायला सुरवात देखील केली आहे. विदर्भातील शेतकरी आता कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ड्रॅगनफ्रुटच्या शेतीकडे (Dragon Fruit Farming) आता मोर्चा वळवत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

अकोला जिल्ह्यातील (Akola) एका शेतकऱ्याने देखील शेतीव्यवसायात आमूलाग्र बदल करत ड्रॅगनफ्रुटच्या शेतीतुन (Dragon Fruit Cultivation) चांगले उत्पादन कमवण्याची किमया साधली आहे. मित्रांनो बाळासाहेब राम चवरे नामक एका शेतकऱ्याने अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याची किमया साधली आहे.

यासाठी सुरवातीला अधिक खर्च करावा लागला असला तरी देखील हे दीर्घकालीन उत्पादन देणारे पीक असल्याने यातून बाळासाहेब यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यासाठी बाळासाहेब यांना जवळपास 17 लाख रुपये खर्च आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या बागेत बाळासाहेब यांनी आंतरपीक घेण्यास देखील सुरुवात केली आहे.

आंतरपिकातून बाळासाहेब यांना लाखो रुपयांचा नफा देखील मिळत आहे. एका वर्षात ड्रॅगन फ्रुट च्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. ड्रॅगन फ्रुट शिवाय बाळासाहेब यांनी वेगवेगळ्या झाडांची लागवड देखील आपल्या शेतात केली आहे.

पांढरा जांभूळ, हापूस आंबा, सफरचंद, फणस इत्यादी फळबाग वर्गीय पिकांची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली असून यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.

बाळासाहेब यांच्या मते, त्यांचे वडील अशिक्षित असूनही शेतीमध्ये कायमच नावीन्यपूर्ण प्रयोग करत असायचे. यामुळे त्यांना कोरडवाहू क्षेत्र असून देखील चांगली कमाई होत असल्याचे बाळासाहेब यांनी नमूद केले.

बाळासाहेब यांनी देखील आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कोरडवाहू जमिनीत कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरुवातीला बाळासाहेबांना सुमारे सतरा लाख रुपयांचा खर्च करावा लागला आहे

मात्र हे पीक वीस वर्षे उत्पादन देणारे असल्याने खर्च वजा जाता त्यांना ड्रॅगन फ्रुट शेतीतुन लाखों रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. याशिवाय आंतरपिकातून बाळासाहेब लाखोंचे उत्पन्न कमवित असल्याने त्यांनी इतर शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा सल्ला दिला आहे.

मित्रांनो खरे पाहता ड्रॅगन फ्रुट हे विदेशी फळ आहे. याची लागवड व्हिएतनाम थायलंड श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात मात्र अजून तरी ड्रायगन फ्रुटची व्यावसायिक स्तरावर शेती बघायला मिळत नाही. बाळासाहेबांसारखे खूपच मोजके शेतकरी सद्यस्थितीला ड्रॅगन फ्रुटची शेती करीत आहेत.

निश्चितच विदेशी जमिनीवर येणारे हे पीक आपल्या भारतीय जमिनीत पिकवणे आव्हानात्मक काम आहे. मात्र बाळासाहेब यांनी हे आव्हान स्वीकारले आणि निश्चितच भविष्यात त्यांना यातून चांगला बक्कळ फायदा होणार आहे.