IMD Rains Alert : पुढील ५ दिवस धो धो पाऊस कोसळणार ! या राज्यांना IMD चा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rains Alert : यंदा राज्यात वेळेवर मान्सून (Monsoon) पोहोचल्यामुळे काही भागातील खरीप पिके जोमात आली आहेत. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला असून येत्या काही दिवसांत अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात काही भागात सरासरी पेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.

पुढील ५ दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, उस्मानाबाद, नांदेड, सातारा, सांगली, लातूर, चंद्रपूर, अमरावती, परभणी, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही दिवस तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.

मच्छीमारांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ५ दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि काही ईशान्य भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली आहे.

मात्र, राष्ट्रीय राजधानीत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला, तर ऑगस्ट महिन्याची नोंद दिल्लीत गेल्या 14 वर्षांतील सर्वात कमी पावसाचा महिना म्हणून केली जाईल. राष्ट्रीय राजधानीत पुढील ५ ते ६ दिवस ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची शक्यता नाही.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

1, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी किनारपट्टीवरील कर्नाटक, तर 1 आणि 5 सप्टेंबर रोजी उत्तर कर्नाटकच्या काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील 5 दिवसांत 1-2 सप्टेंबर रोजी लक्षद्वीपमध्ये, तर 5 तारखेला तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

1 सप्टेंबर रोजी तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढील 3 दिवसांत, पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.