WhatsApp Feature : अनेकांना मिळणार दिलासा ; व्हॉट्सअ‍ॅपने आणले ‘हे’ दमदार फीचर, आता ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Feature : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी (WhatsApp users) एक चांगली बातमी आहे. कंपनीने अखेर ते फीचर आणले आहे, ज्याची लाखो वापरकर्ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

नवीन फीचरचे नाव Who can see when I am online असं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्स अॅप वापरताना त्यांचे ऑनलाइन स्टेटस (online status) लपवू शकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये दिलेल्या लास्ट सीन आणि ऑनलाइन ऑप्शनमध्ये यूजर्सना हा पर्याय मिळेल. WABetaInfo या व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अपडेट्सचा ट्रॅक घेणाऱ्या वेबसाइटने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

ऑनलाइन स्टेटस कोण पाहू शकते हे ठरवता येणार

लास्ट सीन आणि ऑनलाइन पर्यायावर जाऊन यूजर्स त्यांच्या ऑनलाइन स्टेटसची सेटिंग बदलू शकतात हे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

लास्ट सीन मध्ये युजर्सना चार पर्याय मिळतील – Everyone, My Contacts, My Contact Except आणि Nobody. आता ऑनलाइन स्टेटससाठी, कंपनी Everyone आणि Same as last seen चा पर्याय देत आहे.

Who can see my last seen हा पर्याय निवडून, तुमच्या ऑनलाइन असण्याबद्दल कोणाला माहिती मिळते आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवू शकता.

बीटा टेस्टर्ससाठी फिचर उपलब्ध आहे

व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.22.20.9 मध्ये बीटा टेस्टर्स निवडण्यासाठी कंपनी सध्या हे फीचर देत आहे. WABetaInfo नुसार, काही बीटा टेस्टर्स 2.22.20.7 बीटा बिल्डमध्ये देखील हे फिचर मिळू शकते.

कंपनी यशस्वी बीटा टेस्टिंगनंतर जागतिक वापरकर्त्यांसाठी या फिचरची स्टेबल व्हर्जन आणेल अशी अपेक्षा आहे. सध्या, फीचरच्या अधिकृत स्थिर रोलआउट तारखेबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.