WhatsApp update: व्हॉट्सअॅपवर चुकून सेंड झालाय मेसेज? आता दोन दिवसांनंतरही प्रत्येकासाठी हटवू शकाल तो मेसेज, जाणून घ्या नवीन टाइम लिमिट……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp update: वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट आणत असते. आता आणखी एक नवीन अपडेट व्हॉट्सअॅपवर आले आहे. ताज्या अहवालानुसार मेटा (Meta) चे हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन फीचर (Delete message for every feature) साठी अपडेट जारी करणार आहे.

याच्या मदतीने यूजर्स पाठवलेला मेसेज खूप दिवसांनी डिलीट करू शकतील. व्हॉट्सअॅपचे हे फीचर सध्या काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. WABetaInfo ने याबाबत वृत्त दिले आहे. WABetaInfo व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचरवर लक्ष ठेवते.

याच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या नवीन बदलांची संपूर्ण माहिती मिळते. व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट अनेकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कंपनीचे Delete for Everyone फिचर 1 तास 8 मिनिटे आणि 16 सेकंदांच्या मर्यादेसह येते.

आता जे अपडेट येत आहे, त्याची वेळ मर्यादा (Time limit) वाढवली जाईल. अहवालानुसार, त्याची वेळ मर्यादा 2 दिवस आणि 12 तासांपर्यंत वाढवली जाईल. याबाबत WABetaInfo ने स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

हे फीचर सध्या फक्त निवडक बीटा टेस्टर्स (Select beta testers) साठी उपलब्ध आहे. परंतु, जर सर्व काही ठीक झाले तर कंपनी लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी ते जारी करेल. मात्र, कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

याशिवाय इतरही अनेक फीचर्सवर व्हॉट्सअॅप काम करत आहे. यामुळे यूजर्सना मेसेजिंगचा चांगला अनुभव घेता येणार आहे. यात निवडक लोकांसाठी ऑनलाइन स्टेटस (Online status) दाखवण्यासाठी एक फीचर देखील समाविष्ट आहे.