Shiv Sena: अब्दुल सत्तार गेला मात्र आम्ही मरेपर्यंत..’; मुस्लीम शिवसैनिकाने दिला एकनाथ शिंदेंना इशारा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shiv Sena :  शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसौनिक आक्रमक झाले असून ते बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरोधात संपूर्ण राज्यात निषेध करत आहे.

आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील शिर्डी (Shirdi)तालुक्यात देखील एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी हजारोच्या संख्येने शिवसैनिक शामिल झाले होते. सर्वांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात भव्य मोर्चा काढला.

या मोर्चात भगवा ध्वज घेऊन मुस्लिम शिवसैनिक (Muslim Shiv Sainik) देखील सहभागी झाले होते. ‘त्यांनी एक अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेला, मात्र आम्ही हजारो मुस्लिम मावळे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. आम्ही मरेपर्यंत शिवसेनेतच’ राहाणार अशी शपथ मुस्लीम समाजातील शिवसैनिक अजीज मोमीन यांनी घेतली आहे. 

आम्ही शिवसेनेत काम करणारे मुस्लीम मावळे आहोत. ज्यांनी पळ काढला, अशा खासदार आणि आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्धव ठाकरे यांनी आमच्या समाजाला काय नाय दिले? त्यांचे उपकार आम्ही आयुष्यात फेडू शकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहीन

आमचे साहेब उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या वागणुकीमुळेच आम्ही शिवसैनिक झालेलो आहोत. मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहीन अशी शपथ घेतो. आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याच मागे भक्कमपणे उभे राहायचे आहे, असे मी माझ्या मुस्लीम समाजातील प्रत्येक नागरिकाला सांगत आहे. उद्धव ठाकरे हे एकच साहेब आहेत त्यांनी आमच्या समाजाला मान आणि सन्मान दिला, असे अजीज मोमीन यांनी जाहीरपणे म्हटले आहे. 

पुढे ते म्हणाले त्यांनी आमचा एकच अब्दुल सत्तार नेला ना?, त्यांनी माझ्या समाजावर काळिमा फासण्याचा प्रयत्न केला. असे हजारो मुस्लीम मावळे तयार झाले. आता अब्दुल सत्तार यांना त्यांची लायकी शिवसैनिक आणि मुस्लीम समाज दाखवून देईल, असेही मोमीन म्हणाले.