NPS : लाखोंचा फायदा मिळवायचा असेल तर आजच करा येथे गुंतवणूक, जाणून घ्या संपूर्ण योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPS : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही कोठेही म्हणजे जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. सध्या अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रचंड पेन्शन मिळेल.

बऱ्याच वेळा असे दिसून येते की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पगारातून कर म्हणून पैसे कापण्यात येतात. त्यामुळे अनेकांच्या मनात असा प्रश्न तयार होतो की पैसे कुठे गुंतवायचे आणि कर कसा वाचवायचा. 80C अंतर्गत कर्मचार्‍यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.

अशी मिळेल सवलत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे की कलम 80C अंतर्गत, केवळ जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सवलत मर्यादेत येते. यात जीवन विमा प्रीमियम, स्थगित वार्षिकी, PPF मध्ये योगदान, युनिट लिंक्ड विमा योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक, मंजूर डिबेंचर/शेअर/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक, गृहकर्ज 80C ची परतफेड यांचा समावेश असेल. याचा फायदा ग्राहकांना मिळतो.

कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलत मिळेल. गुंतवणुक करून तुम्ही ताबडतोब जास्त कर वाचवू शकता. तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल ऐकले असेल, ज्यात गुंतवणुकीवर खूप फायदे मिळतात.

NPS गुंतवणूक

तुम्हाला कर वाचवायचा असल्यास तर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये जास्तीत जास्त 50,000 रुपये गुंतवता येतात. आयकर कायद्याच्या कलम 80CD(1B) अंतर्गत, तुम्हाला NPS मध्ये केलेल्या बचतीवर 80(C) चे अतिरिक्त कर लाभ मिळेल.

तुम्ही जर NPS मध्ये गुंतवणूक केली तर 50,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक स्वतंत्र आयकर सूटच्या मर्यादेत येत असून 80C समाविष्ट करून, तुम्हाला रु. 2 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर बंपर फायदे मिळतात. त्यामुळे ही संधी गमावू नका.

योजेनची सुरुवात

खाजगी नोकऱ्या असणाऱ्या लोकांनी ताबडतोब NPS खाते चालू करून त्यांचा पगार कमी होण्यापासून वाचवता येईल. कर व्यतिरिक्त, NPS ही एक उत्तम सेवानिवृत्ती योजना मानली जात असून जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे.