OnePlus Nord CE 3 Lite : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाले OnePlus च्या आगामी स्मार्टफोनचे फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Nord CE 3 Lite : सर्वात लोकप्रिय टेक कंपनी वनप्लस आपली नवीन नॉर्ड सीरिज लाँच करणार आहे. कंपनी या सीरिजमध्ये काही नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिड-रेंज लाइनअपमध्ये, कंपनी आपले लवकरच OnePlus Nord 3, Nord CE 3 आणि OnePus Nord CE 3 Lite स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशातच आता OnePlus Nord CE 3 Lite बाबत नवीन माहिती समोर आली आहे. लॉन्च होण्याआधी या फोनचे सर्व फीचर्स लीक झाले आहेत. शक्तिशाली प्रोसेसरसह नवीन फोन लॉन्च होईल. पुढच्या महिन्यात कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.

आता OnePlus Nord CE 3 Lite संदर्भात एक रिपोर्ट समोर आला असून ज्यात असा दावा करण्यात येत आहे की Android 13 आधारित OxygenOS 13 OnePlus Nord CE 3 Lite मध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, कंपनीच्या या फोनमध्ये एलसीडी डिस्प्ले उपलब्ध असणार असून ज्याचा रीफ्रेश दर 1800×2400 पिक्सेल इतका आहे.

OnePlus च्या नवीन स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळेल. तसेच याच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर हा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G तीन रियर कॅमेरा सेटअपसह सूचीबद्ध आहे. या फोनमध्ये 108-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आहे, ज्यात अपर्चर f/1.8 आहे. इतर दोन लेन्सपैकी एक 2-मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर दिला आहे. तर फोनला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

OnePlus Nord CE 3 Lite सह 5000mAh बॅटरी उपलब्ध असून ज्यासह 67W SuperVOOC जलद चार्जिंग उपलब्ध असणार आहे. या फोनचे एकूण वजन 195 ग्रॅम असून कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट दिले जात आहे. हा फोन नवीन लेमन रंगात सादर करण्यात येणार आहे.