शिंदे-फडणवीसांनी बदलले ठाकरे सरकारचे ‘हे’ पाच मोठे निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमझध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा केली.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आधीचे उद्धव ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय पुर्णपणे फिरवले असल्याचे दिसून आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ८ निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळातील ५ निर्णय शिंदे-फडणवीसांनी फिरवले आहेत. आगामी काळात राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे बदलेले निर्णय पुढीलप्रमाणे

ठाकरे सरकारकडून पेट्रोल डिझेलची अधिक करकपात करण्यास टाळाटाळ

शिंदे सरकारकडून पेट्रोलवर पाच रुपये, डिझेलवर तीन रुपये करकपात

ठाकरे सरकारकडून नगराध्यक्षांची नगरसेवकांमधून निवडीचा निर्णय

शिंदे सरकारकडून नगराध्यक्षांची थेट निवडणुकीद्वारे जनतेतून निवडीचा निर्णय

ठाकरे सरकारकडून सरपंचांची ग्रामपंचायत सदस्यांद्वारे निवडीचा निर्णय

शिंदे सरकारकडून सरपंचांची थेट निवडणुकीद्वारे जनतेतून निवडीचा निर्णय

ठाकरे सरकारकडून बाजार समितीत कार्यकारी सोसायटी सेवा संस्थांमधून निवडीचा निर्णय

शिंदे सरकारकडून बाजार समितीत सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकाराचा निर्णय

ठाकरे सरकारकडून आणीबाणीत कारावास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना बंद

शिंदे सरकारकडून आणीबाणीत कारावास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना पुन्हा सुरु