Smartphone Tips 2023 : सावधान! तुम्हीही विकत असाल फोन तर लक्षात ठेवा ‘या’ 4 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Tips 2023 : भारतीय टेक बाजारात सर्व कंपन्या प्रत्येक वर्षी नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. तर अनेकजण नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच झाला तर अनेकजण आपल्याकडे असणारा जुना स्मार्टफोन विकून नवीन स्मार्टफोन विकत घेतात.

अशातच जर तुम्हीही तुमच्याकडे असणारा स्मार्टफोन विकत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

क्रमांक 1

तुम्ही आता ज्या व्यक्तीला तुमचा जुना स्मार्टफोन विकत असाल तर त्या व्यक्तीची माहिती मिळवून एक पत्र बनवा. यात फोन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव, वेळ, तारीख, मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर इत्यादी टाका. त्यानंतर त्यावर स्वाक्षरी करून त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

क्रमांक 2

ज्यावेळी तुम्ही तुमचा जुना फोन कोणाला विकत असाल तर हे लक्षात ठेवा की तो रिसेट केल्यानंतरच तो समोरच्या व्यक्तीला द्यावा. सर्वात अगोदर तुमचा सर्व डेटा काढून टाकान तो रीसेट करा. त्यामुळे तुमचा डेटा कोणाकडेही जाणार नाही.

क्रमांक 3

फोन विकण्यापूर्वी तो नीट तपासून घ्यावा. अनेकजण यावरून त्यांचे Google खाते हटवत नाहीत. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ते तुमच्या अनेक गोष्टींशी निगडित आहे.

क्रमांक 4

ज्यावेळी तुम्ही तुमचा फोन रीसेट करता त्यावेळी तुमच्या डेटाचा काळजीपूर्वक बॅकअप घ्यावा. तुम्ही तुमचा बॅकअप दुसऱ्या मोबाईल, पेनड्राइव्ह किंवा सिस्टीममध्ये घेऊ शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.