भारीच की रावं…! महिला शेतकऱ्याने गच्चीवर सुरु केली भाजीपाला शेती, आज होतेय लाखोंची कमाई; वाचा महिला शेतकऱ्याचा हा भन्नाट प्रयोग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Women Farmer: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) काळाच्या ओघात आता शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करू लागले आहेत. देशातील महिला (Women Farmer) देखील आता शेती व्यवसायात पुढे येऊ लागल्या आहेत.

विशेष म्हणजे महिला शेतकरी शेती व्यवसायात लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया देखील साधत आहेत. देशातील शेतकरी बांधव फार पूर्वीपासून भाजीपाला लागवड (Vegetable Farming) करत आले आहेत. भाजीपाला पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची देखील ठरत आहे.

आता, टेरेस फार्मिंग च्या माध्यमातून देखील शेतकरी बांधव लाखो रुपये उत्पन्न कमवत आहेत. भाजीपाला उत्पादन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी टेरेस फार्मिंग ही शेतीची पद्धत अतिशय उपयुक्त ठरत आहे. टेरेस फार्मिंग च्या माध्यमातून शेतकरी बांधव घरातच भाजीपाला उत्पादित करत आहेत.

टेरेस फार्मिंग मधून आता देशातील शेतकरी इतके उत्पादन घेत आहेत की ते आजूबाजूच्या अनेक घरांच्या भाज्यांची मागणी देखील पूर्ण करत आहेत. यामुळे टेरेस शेती करणाऱ्या लोकांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता दक्षिण काश्मीरच्या सोफियामध्ये टेरेस फार्मिंग खूप प्रसिद्ध होत आहे.

येथील एक महिला शेतकरी गच्चीवर भाजीपाला पिकवून चांगली कमाई करत आहे. महबूबा या महिला शेतकरी त्यांच्या शेतात इतर शेतकऱ्यांप्रमाणे भाजीपाला पिकवण्यासाठी जात नाहीत.  त्याऐवजी त्यांनी आपल्या टेरेसचे रूपांतर शेतात केले आहे. यामुळे या महिला शेतकऱ्याचा प्रयोग सध्या पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मौजे शांत मालदेरा येथे राहणाऱ्या मेहबूबाने काही वर्षांपूर्वी टेरेस फार्मिंगला सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी 1200 स्क्वेअर फूट पसरलेल्या टेरेसवर अनेक पॉली बॅग आणि विविध प्रकारच्या भाज्या असलेली प्लास्टिकची भांडी ठेवली होती.

मेहबूबा पारंपारिक आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या भाजीपाला पिकवतात, जे केवळ तिच्या कुटुंबासाठी पुरेसे नाही तर तिच्या कुटुंबाचे उत्पन्न देखील वाढवत आहे. रायझिंग काश्मीरच्या वृत्तानुसार, मेहबूबा म्हणतात, ती वांगी, कोबी, चेरी टोमॅटो आणि ब्रोकोलीसह अनेक पारंपारिक आणि विदेशी भाज्यांची लागवड करते.

मेहबूबा यांच्या म्हणण्यानुसार, ती भाजीपाल्यातून वर्षाला 70 हजार 1 लाख यादरम्यान सहज कमाई करत आहे. निश्चितच टेरेस फार्मिंग च्या माध्यमातून एक लाख रुपयांची कमाई करत या महिला शेतकऱ्याने इतर महिलांसाठी एक आदर्श रोवला आहे. मेहबुबा सांगतात की, जेव्हापासून त्यांनी टेरेसवर शेती करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांनी कधीच बाजारातून भाजीपाला विकत आणला नाही.

त्यांच्या चांगल्या कामाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन व वाळलेल्या पिशव्यांवर अनुदान मिळत आहे. निश्चितच मेहबूबा यांनी केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. जर शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन केले तर टेरेस फार्मिंग मधून सुद्धा लाखों रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे मेहबूबा यांनी दाखवून दिले आहे.