गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर-जामखेड रस्त्यावरील इला बंद टोल नाक्याजवळ गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे.

संदीप पोपट गायकवाड (वय ४०, रा. जांबूत, ता. शिरुर, जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय २५, रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी शिवारातील बंद असलेल्या टोल नाक्याजवळ गावठी कट्टे विक्री करताना दोघांना पकडले.

संदीप पोपट गायकवाड व भारत भगवा हतागळे अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल, असा एकूण ८० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी गणेश इंगळे,

भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेेेठेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.