Best Selling SUV : काय सांगता! टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा सोडून लोकांची ‘या’ SUV ला सर्वात जास्त पसंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Selling SUV : भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सची बंपर विक्री होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्व ऑटोमोबाइल कंपन्यांत चांगलीच कडवी टक्कर बघायला मिळत आहे.

या सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा अशा शानदार कारमुळे दीर्घकाळापासून मार्केटमध्ये चांगलाच दबदबा राहिला आहे. अशातच आता या कार्सना जबरदस्त टक्कर देत Brezza या फेब्रुवारी 2023 मध्ये बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरली आहे. तिची किती विक्री झाली ते जाणून घ्या.

मारुती ब्रेझा

मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मारुती ब्रेझा ही सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. या कारने एकूण 15,787 युनिट्सची विक्री केली आहे, मागच्या वर्षी याच कालावधीची तुलना केली तर, फेब्रुवारी 2022 मध्ये फक्त 9,256 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत 70.56 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

जाणून घ्या टाटा नेक्सॉनची विक्री

Brezza ने Tata Nexon ला मागे टाकले असून जी जानेवारी 2023 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी SUV होती. तर Tata Nexon फेब्रुवारी 2023 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी SUV होती, कारच्या एकूण 13,914 युनिट्सची विक्री झाली, जे फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 12,259 युनिट्सपेक्षा 13.50 टक्के जास्त आहे.

जाणून घ्या टाटा पंचची विक्री

टाटा पंच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 9,592 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. फेब्रुवारी 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 11,169 युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर विक्रीत 16.44 टक्के वाढ झाली आहे. तर ह्युंदाई क्रेटा यापेक्षाही खाली राहिली.

जाणून घ्या ह्युंदाई क्रेटाची विक्री

फेब्रुवारी 2023 मध्ये Hyundai Creta च्या एकूण 10,421 युनिट्सची विक्री झाली होती, ज्यासह ती चौथी सर्वात जास्त विक्री होणारी SUV होती. फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 9,606 युनिटच्या तुलनेत, तिची विक्री वार्षिक आधारावर 8.48 टक्के जास्त आहे.