कोण रोहित पवार? महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका, तुम्ही अजून लहान आहात; पडळकरांचा पलटवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : पुण्यामध्ये (Pune) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या (Bjp) पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या घटनेचा राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार रोहित पवार यांनी भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे सांगत निषेध केला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पलटवार केला असून ते म्हणाले, कोण रोहित पवार? रोहित पवारांना जरा तरी लाज वाटली पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याने माझ्या गाडीवर दगड फेकला तर त्याचा सत्कार तुम्ही केलात आणि आम्हास संस्कृती सांगताय.

तुम्ही महाराष्ट्राला (Maharashtra) संस्कृती शिकवू नका. तुम्ही जे पेरताय ते उगवते. तुमचा कार्यकर्ता शोधा आणि तोडा असे आदेश काढतो, काल सदाभाऊ बोलत असतान तुम्ही तिथे जाऊन विरोध करताय. एवढा माज एवढी मस्ती कुठून येते? रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात, असे म्हणत त्यांनी पलटावर केला आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरही पडळकरांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला त्यावर कारवाई का नाही झाली? पूजा चव्हाण प्रकरणावेळी कुठे होत्या सुप्रिया सुळे? असे सवाल त्यांनी केले आहेत.

तसेच तुमचे कार्यकर्ते स्मृती इराणी, सदाभाऊ यांच्यावर जाऊन हल्ल्याचा प्रयत्न करतात. पोलिसांच्या ताब्यात असताना केतकीवर हल्ले करता, का तर पोलीस तुमचे ऐकतात म्हणून? तसेच एका घटनेत एक गुन्हा दाखल झाला ठीक आहे, पण १३ गुन्हे कशासाठी दाखल करता?

कायदेशीर कारवाई होऊ द्या पण तुम्ही हल्ले करताय ही कुठली पद्धत? जेव्ह जेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्ता येते तेव्हा तेव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतो, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.