Budh Gochar 2024 : 11 दिवसांनंतर ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाइम सुरु; राशिचक्रात होत आहेत विशेष बदल !

Budh Gochar 2024

 

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका वैशिष्ट वेळाने आपली राशी बदलतो, जेव्हा-जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक तसेच नाकारात्मक प्रभाव पडतो.

अशातच, प्रगती, बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रगती, निर्णय, नोकरी आणि व्यवसायाचा कारक बुध फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा राशी बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच कुंभ राशीचा शासक ग्रह शनि आहे.

दरम्यान, या दोन ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. चला जाणून घेऊया बुधाच्या या राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल…

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल, पद-प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळतील. मुलांकडून आनंद मिळू शकेल. स्पर्धेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात येणारे अडथळे दूर होतील.

सिंह

कुंभ राशीतील बुधाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी देखील शुभ राहील. कठीण वैवाहिक जीवनात गोडवा येईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ

बुधाचा हा राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम राहील. तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल. व्यवसायात लाभ होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल.

कुंभ

बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना उर्जेने भरून टाकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी कळेल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण देखील शुभ राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. ऊर्जा वाढेल.