उद्या फडणवीस पोलीस चौकशीसाठी हजर राहणार; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पोलिसांनी (Police) नोटीस दिली असून उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे.

फडणवीस यांना मुंबई (Mumbai) पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च रंगत आहे.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे.

मात्र तरीही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे ते म्हणाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारमधील गृहविभागातला महाघोटाळा मी मार्च २०२१ उघडकीस आणला होता. माझ्याकडे यासंदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेनड्राइव्ह सगळं माझ्याकडे आहे, हे सांगितलं होतं.

ते देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय, हे म्हटलं होतं. त्यानुसार, जी काही घोटाळ्याची माहिती होती, ती सगळी माहिती त्याच दिवशी दिल्लीला गेलो आणि होम सेक्रेटरी यांना सगळी माहिती सादर केली होती.

त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मा. न्यायालयाने यासंदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली आहे. बदल्यांसंदर्भातील घोट्ळ्याची चौकशी सीबीआय करतेय. अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) चौकशी होतेय. हे तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत. अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत.

मात्र ज्यावेळी सीबीआयला चौकशी ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्याकरिता एफआयआर दाखल केला. ऑफिसिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली, असा एफआयआर दाखल केला. यासंदर्भात मला पोलिसांच्यावरीते प्रश्न पाठवण्यात आले. मी उत्तर दिलं होतं की, याची माहिती देईन असे त्यांनी सांगितले आहे. .

खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापि, मला पुन्हा एकदा प्रश्नावली पाठवण्यात आली आणि कोर्टात सांगण्यात आलं की मी उत्तर देत नाहीये.

काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात, त्यांच्या एफआयआरच्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.