रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करणार : आ. संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-गेल्या ८ ते १0 महिन्यापासून देशावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे विकासकामासाठीचा निधी ठप्प केला आहे.

त्यामुळे गेल्या १ वर्षापासून खासदार व आमदार निधीतही कपात करण्यात आली. तरीही शहर विकासाची कामे सुरु आहेत. पुढील काळात केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पाठपुरावा करणार आहे.

अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचे कामे सुरू केली आहेत. पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारे रस्त्याची कामे करणार आहे. आकाशवाणी ते भिस्तबाग महालापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, ते कामही चांगल्या दर्जाचे केले जाईल.

नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी नेहमीच प्रभागाच्या विकासाला चालना देण्यासाठी पाठपुरावा करीत असतात, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. प्रभाग क्र. १ मधील पंचवटीनगरमध्ये ओपन स्पेस सुशोभिकरण व बंद पार्डप गटार कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, अभिजित खोसे, वैभव ढाकणे, तुषार यादव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले की, मागील वर्षामध्ये नगर शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसत होते.

त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ठेकेदाराच्या मार्फत शहरातला कचरा संकलित करण्याच्या कामाला सुरुवात केल्यामुळे आज नगर शहर कचरामुक्त झाले असून पुढील काळात भारत स्वच्छ अभियानामध्ये नगर शहराचा मान नक्कीच उंचावेल असे काम आता आपल्याला सुरु करावयाचे आहे.

लवकरच शहरातील लाईटचा प्रश्‍नही मार्गी लावण्यासाठी ठेकेदारामार्फत काम सुरु केले असून तेही काम लवकरच मार्गी लागेल, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना नगरसेविका बारस्कर म्हणाल्या की, प्रभागाच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला आहे.

या विकास कामांमध्ये नागरिकांना बरोबर घेऊन कामे करत आहोत. पंचवटीनगरमधील ओपन स्पेसचे सुशोभिकरण करण्यासाठी आ. जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून सुशोभिकरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

प्रभाग १ मध्ये भविष्यकाळात या भागातील नागरिकांसाठी मोठे उद्यान साकारण्याच प्रयत्न करणार आहे. या कामासाठी आ. जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभणार असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment