राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणी महिलांना राहण्यासाठी मिळेल 50% सूट, महिला पर्यटकांसाठी खास ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र मध्ये पर्यटनाला भरपूर असा वाव असून दरवर्षी विविध पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही प्रचंड प्रमाणात असते. या सगळ्या पर्यटन स्थळांचे नियोजन किंवा जबाबदारी ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीकडे असून या पर्यटन स्थळांच्या संदर्भातले सगळे महत्वाचे कामे या महामंडळाच्या माध्यमातून पार पाडले जातात.

आता आपण जर पर्यटकांचा विचार केला तर दरवर्षी पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये महिला पर्यटकांची देखील संख्या मोठी असते. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास महिला पर्यटकांकरिता एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे महिला पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार असून त्यांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागेल हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.

 पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी मिळणार 50% सूट

त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला पर्यटकांकरिता एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास महिला पर्यटकांसाठी एक ऑफर आणण्यात आली आहे

व त्यानुसार एक ते आठ मार्च 2024 या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जे काही उत्कृष्ट असे पर्यटक निवास आहेत त्या निवासांमध्ये महिलांना राहण्याकरिता ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ही सवलत एक ते आठ मार्च या कालावधी करिता वैध असणार आहे.

 काय आहेत या योजनेच्या नियम अटी?

या ऑफरचा लाभ महिला पर्यटकांना घ्यायचा असेल तर त्याकरिता महामंडळाची अधिकृत वेबसाईट www.mtdc.co वर जाऊन बुकिंग करणे गरजेचे राहील. ही ऑफर फक्त महिला पर्यटकांसाठी वैध असणार असून त्याकरिता त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवणे गरजेचे राहणार आहे. तसेच निवासामध्ये चेकिन करिता महिला स्वतः उपस्थित असणे अनिवार्य आहे.

ही सवलत एक ते आठ मार्च या कालावधी करिता असणार आहे. तसेच कॉन्फरन्स हॉल, लॉन्स तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि ऑडिटोरियम यांना ही ऑफर लागू राहणार नाही. तसेच या सवलतीच्या माध्यमातून बुकिंग साठी जी रक्कम भरली जाईल ती रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही.

तसेच देण्यात येणारी ही सवलत महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसाठी जोडली जाणार नाही. यामध्ये एका वेळी केवळ एका सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच या सवलतीमध्ये नाश्त्याचा देखील समावेश नाही.