अहमदनगर मधील ‘त्या’नि पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र अणि मागितले इच्छा मरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील भिकाजी भाऊराव थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना निवेदन लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

त्याचे कारणही तसेच आहे. ते मागील 6 वर्षांपासून सेवानिवृत्त झाले असून त्यांना अजूनही सेवानिवृत्तीचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

कोरोना काळात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मला सध्या वयोमानाने कोणतेही काम होत नाही, सध्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रचंड मानसिक तणाव आहे.

सेवानिवृत्ती वेतन देणेबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी असे यात म्हटले आहे. थोरात हे नगर शासकीय धान्य गोदामात सेवेत होते.

मे 2014 ला सेवानिवृत्त झाले, त्यांनी सेवानिवृत्ती वेतन मिळावे, त्याबाबतचे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाला दिली, तसेच ते गेल्या 6 वर्षांपासून आपल्याला सेवानिवृत्ती वेतन मिळावे म्हणून पाठपुरावा करत आहेत.

सेवा निवृत्ती वेतन कामी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे 1591/2018 रोजी, फेब्रुवारी 2018 मध्ये सेवानिवृत्ती देणेबाबत निकाल देण्यात आलेला आहे.

2018 ला उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून श्री. थोरात हे जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पाठपुरावा करत असून, वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यावर त्यांचे उत्तर मला मिळालेले नसल्याने माझ्या मागणीचा कोणीही विचार करत नाही, असे थोरात यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment