Mhada News: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ‘या’ विजेत्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाकडून घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News:- पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून आणि गृहप्रकल्प उभारले जातात व लॉटरी पद्धतीने यातून विजेते ठरवले जातात. याच अनुषंगाने जर आपण म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट 2023 मध्ये जी काही 4082 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली होती व या सोडती मधील जे काही प्रतीक्षा यादीमध्ये विजेते होते त्यांच्याकरिता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे व हा निर्णय नक्कीच प्रतीक्षा यादीतील विजेत्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

 प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी आनंदाची बातमी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या मुंबई मंडळांने ऑगस्ट 2023 मध्ये 4082 घरांसाठी सोडत काढली होती व या सोडतीमध्ये ज्या विजेत्यांचा समावेश प्रत्यक्ष यादीमध्ये होता त्यांच्याकरिता आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानुसार आता सोडती मधील जे काही प्रतिक्षा यादीवरील विजेते आहेत त्यांना ऑनलाइन स्वीकृती पत्राचे वितरण करण्यात आले असून यामध्ये एकूण 312 विजेत्यांचा समावेश आहे.

त्यामुळे आता या विजेत्यांना घराची स्वीकृती व घर परत करण्याबाबतचा जो काही निर्णय आहे तो  दहा दिवसांच्या मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने कळवण्यात येणार आहे. दहा दिवसांच्या मुदतीमध्ये जे घराची स्वीकृती देतील त्यांना पुढे तात्पुरते देकारपत्र वितरित करून त्यांच्याकडून घराचा ताबा घेण्यासंदर्भातील पुढील प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे.

 सध्या अशा पद्धतीने सुरू आहे प्रक्रिया

मुंबई मंडळाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट रोजी 4082 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली होती व यामध्ये पात्र ठरलेल्या 3515 विजेत्यांना 5 सप्टेंबर रोजी तात्पुरते देकार पत्र पाठवण्यात आले असून त्यांच्याकडून घराची 25% वा संपूर्ण रक्कम भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे.

परंतु यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी घर नाकारलेले आहे अशा जागी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना  संधी देण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सोडतीतील एकूण विजेत्यांपैकी 437 विजेत्यांनी थेट घरे नाकारले आहेत.

त्यामुळे जी घरे नाकारली गेलेली आहे त्या घरांसाठी आता नियमानुसार प्रतीक्षा यादी वरील विजेत्यांना  संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 437 पैकी 312 घरांसाठी प्रतीक्षा यादी वरील विजेते जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या 312 प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना दहा दिवसात स्वीकृती व घर परत करणार याबाबतचा निर्णय ऑनलाईन पद्धतीने स्वीकृती पत्राद्वारे कळवावा लागणार आहे. यामध्ये जे विजेते स्वीकृती देतील त्यांना घराचे वितरण करण्यात येणार आहे.