Nashik Expressway: आता 5 नव्हे 2 तासात गाठता येईल नाशिककरांना मुंबई! ‘या’ 6 लेनच्या महामार्गाकरिता 275 कोटीचे टेंडर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Expressway:- सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी महामार्गांची कामे सुरू असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी आणि कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

नागपूर-मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णतः सुरू होण्याची शक्यता असून इतर महामार्ग या समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात असून या माध्यमातून इतर शहरांशी मुंबई आणि नागपूर सारख्या शहरांची कनेक्टिव्हिटी मिळण्यास  मदत होणार आहे.

या अनुषंगाने जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर या शहर व परिसराचा मुंबईशी अनेक दृष्टिकोनातून संबंध असून सध्या जर नाशिककरांना मुंबईला जायचे असेल तर साधारणपणे पाच तासाचा कालावधी लागतो.

परंतु आता नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ते गोंदे दरम्यान सहा पदरी महामार्गाचे विस्तारीकरण व या महामार्गावरून समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी साठी गोंदे ते पिंपरी सदो यादरम्यान वीस किलोमीटरच्या सहा पदरी कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 1025 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 नाशिककरांना दोन तासात गाठता येईल मुंबई

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ते गोंदे यादरम्यान सहापदरी विस्तारीकरण करणे, या महामार्गावरून समृद्धी महामार्गाला जोडण्याकरिता गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यान वीस किलोमीटरच्या सहा पदरी कॉंक्रिटीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तब्बल 1025 कोटी रुपयांची टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पिंपळगाव बसवंत ते गोंदे या 60 किलोमीटर रस्त्याकरिता 275 कोटी तर गोंदे ते पिंपरी सदो या समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणाऱ्या 20 किलोमीटर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाकरिता साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

जेव्हा पिंपळगाव बसवंत ते गोंदे दरम्यान सहा पदरीकरण पूर्ण होईल तेव्हा या महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल व समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नाशिक अंतर दोन तासात पूर्ण होऊ शकणार आहे.

 एनएचएआयमार्फत हे काम हाती घेण्याचे प्रमुख कारण

त्या जर आपण मुंबई ते आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील स्थिती पाहिली तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व इगतपुरी तालुक्यातील गोंदे या ठिकाणी वाहनांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते व ट्रॅफिक जास्त असल्यामुळे वाहतूक मंद गतीने चालते.

या परिसरातून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. तसेच जळगाव व धुळे कडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे नाशिक शहरांमध्ये  बऱ्याचदा वाहतूक ठप्प होणे तसेच वायू व ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या सगळ्या समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून  या महामार्ग विस्तारीकरणाला व कॉंक्रिटीकरणाला महत्त्व आहे.

 नाशिककरांना दोन तासात कशा पद्धतीने गाठता येईल मुंबई?

मुंबई आणि नाशिकचे अंतर दोनशे किलोमीटरचे आहे. परंतु हा दोनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागतो. नाशिक वरून मुंबईला जाण्यासाठी नव्याने झालेला समृद्धी महामार्ग सोयीचा आहे. इगतपुरीच्या पुढे अजून देखील या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे नाशिककरांना या अपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होणे व समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून पर्यायी मार्गाची नाशिककरांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. येणाऱ्या काही दिवसात समृद्धी महामार्गाचा इगतपुरी पासून ते आसनगाव पर्यंतचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे

व त्याच्या पुढच्या टप्प्यात अंतिम टप्पा देखील पूर्ण होऊन संपूर्णपणे समृद्धी महामार्ग वाहतुकी करिता खुला होण्याची शक्यता आहे व तोपर्यंत गोंदे ते पिंपरी सदो हा 20 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नाशिककरांना याठिकाणी दीड तासात मुंबई गाठता येणार आहे.

तसेच वीस किलोमीटरच्या या सहा लेनच्या काँक्रीटच्या महामार्गामुळे नाशिक ते समृद्धी इंटरचेंज पर्यंतचे अंतर अर्धा तासात पोचता येणार असल्यामुळे नाशिक व मुंबईच्या अंतर देखील आता दोन तासांवर येण्यास मदत होणार आहे.