संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला राज ठाकरेंचे प्रतिउत्तर; म्हणाले, बडबड करण्याची सवय लावावी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी ते आमदार राजू पाटील (Raju patil) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा एकेरी वाक्यात त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

आमदार राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार असून त्यांच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.

तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. यासोबतच मनसे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येन कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांची नक्कल करत म्हणाले होते की, ‘ते संजय राऊत किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते.

चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. मी आलो..भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व… अरे आता नीट बोलत होता.

काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा हल्लाबोल राज यांनी राऊतांवर केला होता.

त्यावर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर देत मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सवाल केला होता. मात्र आता राज यांनी केलेल्या या टीकेला राऊत काय प्रतिउत्तर देतील हे लवकरच समजणार आहे.