तर .. भाजपची डोकेदुखी वाढणार ! मोदी-शाहा काय पाऊल टाकणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतमोजणी आज आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीत भाजपला (Bjp) अडचणी येण्याची शक्यता असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) व भाजपचे अध्यक्ष अमित शाह (Amit shah) याबाबत काय निर्णय घेणार हे निकाल (Result) संपल्यानंतरच समजणार आहे.

एक्झिट पोल खरे ठरल्यास भाजपच्या अडचणी वाढणार?

एक्झिट पोलची भविष्यवाणी खरी ठरल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढतील. विविध वृत्तवाहिनींच्या एक्झिट पोलची सरासरी काढल्यास भाजपला उत्तर प्रदेशात २४० जागा मिळतील.

भाजपला २४० जागा मिळाल्यास त्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७२ नं कमी असतील. तसं झाल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला काही पक्षांची मदत लागेल.

सध्याची समीकरण पाहता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाजप उत्तम स्थितीत आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

दरम्यान, विविध समीकरणांनुसार, भाजपप्रणित एनडीएच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या मतांचं मूल्य एकूण मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी करायचा असल्यास भाजपला मित्रपक्षातील काही मित्रांची मदत लागेल.