कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जा – आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीमुळेच्या पाण्यामुळे शहरासह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे.

तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. सावेडीउपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढल्यामुळे रहदारीचे प्रमाणही वाढले आहे.

उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी नगर सेविका शोभाताई बोरकर व ज्योतीताई गाडे यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. आता पाऊस उघडला असल्यामुळे संपूर्ण शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला गती आली आहे.

पॅचींगचे कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. यासाठी आज त्या कामाची तपासणी करून उत्कृष्ट दर्जेचे पॅचींग करण्याचे आदेश दिले अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. गुलमोहर रोड वरील खड्डे बुजवण्याच्या कामाची तपासणी करताना आमदार संग्राम जगताप समवेत जेष्ठ नेते घनशाम शेलार, मा. नगर सेवक बाळासाहेब पवार,

अजिक्य बोरकर, निखिल वारे, अमोल गाडे, शहर अभियांता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत निबांळकर, मनोज पारखी, कुमार नवले, योगेश खरमाळे, अनुम सत्राळकर, विनोद भिंगारे,

अरबाज शेख, गणेश गोधाडे, आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की खड्डे बुजवण्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्यावर पुन्हा ते काम करावे लागत नाही.

यासाठी पॅचींगचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी अधिकार्‍यांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे. पॅचींगचे काम चालू असतांना ठेकेदारांनी कामाकडे लक्ष द्यावे.

चांगल्या दर्जेच्या काम झाल्यावर नागरिकांनाही खड्यांपासून मुक्ती मिळेल या खड्यांमुळे छोटेमोठे अपघात होऊन नागरीक जखमी होत आहेत.

नागरिकांना चांगल्या दर्जेची सेवा देण्याची काम आपले आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल्यास शहरातील नागरीकांचे प्रश्न कमी होतील. व शहर विकासाला चालना मिळेल असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment