Best Fixed Deposit Schemes : एसबीआयच्या दोन खास FD योजना; बघा व्याजदर

Best Fixed Deposit Schemes

Best Fixed Deposit Schemes : गेल्या काही वर्षात FD मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बँका गेल्या काही काळापासून FD वर चांगले व्याज देत आहेत. दरम्यान, बँका जास्तीत-जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या गुंतवणूक योजना देखील आणत आहेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI द्वारे देखील अनेक विशेष FD योजना चालवल्या जात आहेत. यापैकी काही एफडीमध्ये गुंतवणूकदारांना अतिशय आकर्षक व्याजदर मिळतात. अशातच आज आम्ही या लेखात SBI We Care आणि SBI अमृत कलश बद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. चला तर मग या योजनांबद्दल जाणून घेऊया-

SBI We Care FD

ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI We Care FD योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोणताही ज्येष्ठ नागरिक 5 ते 10 वर्षांसाठी एफडी करू शकतो. पण लक्षात घ्या या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच घेता येणार आहे. या नंतर ही योजना बंद होणार आहे. सध्या SBI We Care FD वर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. अशातच तुमचा देखील येथे गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही 30 सप्टेंबरपूर्वी येथे गुंतवणूक करू शकता.

SBI अमृत कलश FD

SBI ने फेब्रुवारीमध्ये 400 दिवसांची ‘अमृत कलश’ FD लाँच केली होती. या एफडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.1 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळत आहे. गुंतवणूकदार या एफडीमध्ये 15 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यानंतर ही योजना देखील बंद केली जाणार आहे. तरी इच्छुक गुंतवणूकदारांनी त्यापूर्वी येथे गुंतवणूक करावी.

SBI FD वर व्याजदर

-7 दिवस ते 45 दिवसांसाठी 3 टक्के
-46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 4.5 टक्के
-180 दिवसांपासून 210 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 5.25 टक्के
-211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी FD वर 5.75 टक्के
-एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा कमी FD वर – 6.8 टक्के
– दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी FD वर 7.00 टक्के
-तीन वर्षे ते 10 वर्षे FD वर – 6.50 टक्के