HDFC Parivartan Scholarship: एचडीएफसी बँक ‘या’ विद्यार्थ्यांना देईल 75 हजार रुपयांची स्कॉलरशिप! वाचा संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Parivartan Scholarship:- सध्या शैक्षणिक शुल्क पाहिले तर ते खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रत्येकाला ते परवडत नाही. बऱ्याच कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थी हुशार असून देखील त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. याशिवाय शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो व देशातील विविध बँकांच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज देखील दिले जाते.

यामध्ये जर आपण एचडीएफसी बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून 2023-24 या शैक्षणिक वर्षांमधील इयत्ता पहिली ते पदव्यूत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे.

एचडीएफसी बँकेची ही शिष्यवृत्ती योजना एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम 2023-24 या नावाने ओळखली जाते. यासंबंधीचे संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता

1- एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन योजनेच्या स्कॉलरशिप साठी जे उमेदवार अर्ज करतील ते इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार आणि पदवी/ पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे असावेत.

2- तसेच जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांना मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये 55% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

3- तसेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

4- तसेच उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे असणार आहे.

 इयत्ता अभ्यासक्रमानुसार किती मिळणार शिष्यवृत्ती?

1- पदव्यूत्तर पदवी( जनरल)- 35 हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

2- पदव्यूत्तर पदवी( प्रोफेशनल)- 75 हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

3- पदवी( जनरल)- तीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

4- पदवी( प्रोफेशनल)- २५ ते ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

5- आयटीआय/ पॉलिटेक्निक/ डिप्लोमा अठरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

6- इयत्ता सातवी ते बारावी( सर्व शाखा)- अठरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

7- इयत्ता पहिली ते सहावी पर्यंत पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल.

 याकरिता कुठली कागदपत्रे लागतात?

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पासपोर्ट साईज फोटो, मागील वर्षाचे मार्कशीट, आधार कार्ड/ मतदान कार्ड/ वाहन चालवण्याचा परवाना, चालू वर्षाचे म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 चे शाळा/ महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फी भरल्याची पावती आणि पालकांचा उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक असतील.

 अर्ज कसा करावा?

या शिष्यवृत्ती योजने करता पात्र असल्या विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पात्र असलेल्या उमेदवारांना जर या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करणे गरजेचे आहे.