IDFC First Bank Personal Loan: आयडीएफसी फर्स्ट बँक देईल तुम्हाला 25 ते 40 हजारापर्यंत पर्सनल लोन! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDFC First Bank Personal Loan:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर पैशांची गरज असते व यावेळी आपल्याला जितक्या पैशांची आवश्यकता आहे तितका पैसा आपल्याकडे असेलच असे होत नाही. त्यामुळे साहजिकच आपण बँकेच्या माध्यमातून किंवा एखादी एनबीएफसीच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करतो.

अशा प्रकारची आपत्कालीन गरज भागवण्यासाठी जास्त करून पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जाचा आधार घेतला जातो. यामध्ये विविध बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते व त्याचे व्याजदरापासून व इतर महत्त्वाचे नियम वेगवेगळे असतात. जर तुम्हाला देखील पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून घेऊ शकतात. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण आयडीएफसी वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन कसे घ्यावे? व त्याची इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन

तुम्ही जर आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून पर्सनल लोन घेतले तर ती कर्जाची रक्कम  तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये हस्तांतरित केली जाते. जर आपण या बँकेच्या पर्सनल लोनची थोडक्यात माहिती बघितली तर तुम्हाला जर या बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे वय 23 ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे.

तसेच हे कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच उत्पन्नाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि मागील तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या पर्सनल लोन च्या व्याजदराचा विचार केला तर ते प्रति वर्ष ११ टक्के पासून सुरु होते

व या कर्जावर तुम्हाला 3.5% प्रोसेसिंग फीस म्हणजेच प्रक्रिया शुल्क लागते. तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने देखील घेऊ शकतात व जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत तुम्हाला पर्सनल लोन या माध्यमातून मिळते. या बँकेकडून घेण्यात येणाऱ्या पर्सनल लोनचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे.

 आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन साठीची पात्रता

1- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

2- अर्जदाराकडे मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.

3- तसेच मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी जोडलेला असणे गरजेचे आहे.

4- कर्जासाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असणे देखील गरजेचे आहे.

5- बचत खात्याचा इंटरनेट बँकिंग आवश्यक असते.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला कर्ज मिळू शकते. सिबिल स्कोर हा साडेसातशे किंवा त्यापेक्षा अधिक असावा.

 आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज

1- तुम्हाला जर आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या पर्सनल लोन करीता ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्याकरिता या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

2- त्यानंतर होम पेजवर गेल्यावर कर्जाच्या पर्यायांमध्ये पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्ज हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.

3- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल व या पेजवर आल्यानंतर तुम्हाला प्रथम तुमची पात्रता तपासणे गरजेचे आहे.

4- जर तुम्ही पर्सनल लोनसाठी पात्र ठरला तर तुम्हाला या पेजवर अप्लाय नाऊ हा पर्याय दिसेल व त्यावर क्लिक करावे.

5- त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होतो व त्या ठिकाणी विचारलेले आवश्यक माहिती भरावी लागेल व फॉर्म सबमिट करावे लागेल.

6- त्यानंतर तुमची पात्रता किती आहे त्यावर आधारित तुमची कर्जाची विनंती मंजूर केली जाते.

7- त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.

8- कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

 कर्जासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

तुम्हाला जर आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन करीता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शाखेला भेट देऊन आपल्या पद्धतीने अर्ज करता येईल.

 आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचे काय मिळतात फायदे?

1- वैयक्तिक कर्जाचा या ठिकाणी तुम्हाला अनेक कर्जाच्या ऑफर उपलब्ध असतात.

2- बँकेत न जाता तुम्ही आयडीएफसी मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील घरबसल्या कर्ज घेऊ शकतात.

3- कर्ज घेण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेमेंट अगोदर करावे लागत नाही.

4- तुम्ही वेळेपूर्वी देखील तुमच्या कर्जाची परतफेड करू शकतात किंवा आवश्यक असल्यास तुम्ही कर्ज टॉप-अप देखील करू शकता.

5- 12% ते 20 टक्के पर्यंतचे वार्षिक व्याज हे पात्रतेनुसार जास्त असू शकते.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून कुठल्याही गॅरंटी किंवा तारणाशिवाय वैयक्तिक कर्ज मिळते.

7- तुमच्या कोणत्याही गरजांसाठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन सहज मिळवू शकतात.

8- भारतातील कोणत्याही शहरातून किंवा कोणत्या ठिकाणातून तुम्ही पर्सनल लोन मिळवू शकतात.

9- एचडीएफसी फर्स्ट बँकेकडून 25 ते 40 हजार पर्यंतचे कर्ज ताबडतोब घेतले जाऊ शकते.

10- पेमेंट करिता साठ महिन्यापर्यंतचा कालावधी तुम्हाला उपलब्ध होतो.