Personal Loan Tips: अचानकपणे पैशांची गरज पडली व पर्सनल लोन घ्यायचे आहे तर फॉलो करा ‘या’ टिप्स! झटक्यात मिळेल लोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan Tips:- जीवनामध्ये अचानकपणे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय समस्या, घरातील लग्न कार्यासारखे इतर कार्यक्रम, प्रवासाचा प्लॅनिंग या व इतर अनेक गोष्टींसाठी अचानकपणे पैशांची गरज भासते. त्यामुळे आपल्याकडे असलेला पैसा पुरेसा नसतो व साहजिकच याकरिता बँकांच्या माध्यमातून  पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न केला जातो.

पण जेव्हा एखादा व्यक्ती बँकेमध्ये पर्सनल लोन घ्यायला जाते तेव्हा बँकेकडून काही गोष्टी बघितल्या जातात व बँकेच्या त्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब कर्ज दिले जाते. त्यातच पर्सनल लोन हा असुरक्षित कर्जाचा प्रकार असल्यामुळे  बँकांकडून देखील देण्यात आलेल्या या लोन वरील धोका कमी करण्यासाठी अनेक नियमांचे पालन केले जाते.

त्यामुळे अशा पद्धतीने पर्सनल लोन तुम्हाला देखील ताबडतोब मिळावे यासाठी तुमची ते लोन घेण्यासाठीची पात्रता अधिक योग्य असणे गरजेचे आहे. भविष्यात तुम्हाला अशा पद्धतीने ताबडतोब बँकेकडून पर्सनल लोन हवे असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

 ताबडतोब पर्सनल लोन हवे असेल तर फॉलो करा या टिप्स

1- सिबिल स्कोर वर लक्ष द्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे गरजेचे असते हे आपल्याला माहिती आहे. सिबिल स्कोर 750 च्या वर जर  असेल तर तुम्हाला अधिक आकर्षक कर्जदार बनवण्यामध्ये मदत होते.

सिबिल स्कोर चांगला करण्यासाठी तुम्ही घेतलेली सर्व कर्जांचे हप्ते तसेच क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच कमी क्रेडिट युटीलायझेशन रेशो कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा व कमी कालावधीत जास्त क्रेडिट साठी अर्ज करणे टाळावे.

2- तुमचे कर्ज ते उत्पन्नाचे प्रमाण म्हणजे डीटीआय रेशो कमी करा डीटीआय रेशो ही संकल्पना खूप महत्त्वाची असून यामध्ये तुमचे मासिक उत्पन्न किती आहे व तुमचे मासिक कर्जाचे हप्ते किती जातात हे साधारणपणे पाहिले जाते व या माध्यमातून बँकांना याव्यतिरिक्त जास्तीचे कर्ज तुम्ही हँडल करू शकतात का व तेवढे उत्पन्न तुमच्याकडे आहे का हे कळायला मदत होते.

त्यामुळे भविष्यामध्ये जर तुम्हाला कर्जाचा लिमिट किंवा ताबडतोब कर्ज हवे असेल तर तुम्ही तुमचा डीटीआय रेशो कमी करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे जे काही सध्या कर्ज असतील ते वेळेवर फेडण्यासाठी प्रयत्न करावा.

3- उत्पन्नात वाढ करावी जास्त उत्पन्न हे कर्ज फेडण्याची क्षमता निश्चित करत असते. याकरिता तुम्ही अधिक उत्पन्न वाढवण्याचे मार्गांचा शोध घेणे गरजेचे आहे व त्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये तुम्ही नोकरी व्यतिरिक्त एखाद्या दुसरा पर्यायाच्या माध्यमातून कमाई करू शकतात.

4- कामात सातत्य ठेवा तुम्ही तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये सातत्य दाखवल्यास पगाराची नोंद बँकांना आर्थिक दृष्टीने विश्वासार्हता दर्शवते. वारंवार नोकरीतील बदल किंवा नोकरी सोडणे किंवा खूप कालावधीनंतर नोकरी करणे यामुळे तुमच्या पगाराची नोंद असमानकारक असल्याने बँका याबाबत निगेटिव्ह विचार करू शकतात व कर्ज मिळण्यात अडसर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नोकरी-व्यवसायात सातत्य ठेवावे.

5- एखाद्याला कर्जासाठी जामीनदार व्हा परंतु सांभाळून जर तुम्ही कुणाला त्याच्या कर्जासाठी जामीनदार होत असाल तर त्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. कारण समोरील व्यक्तीने जर कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला देखील भोगावे लागतात. अशा प्रकरणांमध्ये तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोणाला कर्जाकरिता जामीनदार झाले असाल तर संबंधित व्यक्ती वेळेवर कर्जाचे हप्ते भरतोय की नाही हे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही या साध्या गोष्टी फॉलो करून तुमची आर्थिक जबाबदारी बँकांना दाखवून पर्सनल लोन साठी तुमची पात्रता वाढवू शकतात.